संरक्षण मंत्रालय
रियर ॲडमिरल संदीप मेहता यांनी फोमा- फ्लॅग ऑफिसर कमांडिंग महाराष्ट्र नेव्हल एरिया (FOMA) म्हणून कार्यभार स्वीकारला
Posted On:
16 DEC 2021 8:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2021
रियर ॲडमिरल संदीप मेहता, व्हीएसएम, यांनी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग महाराष्ट्र नेव्हल एरिया म्हणून मुंबई येथे 16 डिसेंबर, 21 रोजी पदभार स्वीकारला. पदभार देणे आणि स्वीकारण्याचा औपचारिक कार्यक्रम आयएनएस कुंजली येथे आयोजित करण्यात आला. या ठिकाणी त्यांना पथसंचलनातून मानवंदना देण्यात आली.
रियर ॲडमिरल मेहता भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत 1 जानेवारी 1989 ला रुजू झाले. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत आणि सैन्य युद्ध महाविद्यालय, महूचे स्नातक आहेत. फ्लॅग श्रेणीवर पदोन्नती मिळण्यापूर्वी ते परराष्ट्रविषयक कामगिरीवर संरक्षण आणि नौदल संलग्न म्हणून, भारतीय दूतावास, वॉशिंग्टन डीसी येथे नियुक्तीवर होते.
त्यांचे शिक्षण नॉटीकल विज्ञान आणि रणनीती मोहिमा यात पदव्युत्तर पदवी, संरक्षण आणि सामरिक अभ्यासक्रम यात एम फील आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका असे झाले आहे.
विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी असलेले ॲडमिरल, यांनी त्यांच्या नौदलातील कारकिर्दीत किनाऱ्यावरील माईनस्वीपर, आयएनएस अल्लेपी, लँडिंग शिप टॅंक, आयएनएस गुलदर आणि गायडेड क्षेपणास्त्र विनाशक आयएनएस दिल्ली यासारख्या अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी आयएन नौका सुकन्या आणि ज्योतीवर दिशादर्शक अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांच्या कारकीर्दीच्या सुरवातीच्या काळात त्यांची नेमणूक आयएनएस रणविजय, शार्दुल, चपळ आणि विभूती या युद्ध नौकांवर होती तसेच कॉर्व्हेट प्रकारच्या आयएनएस कर्क चे कमिशनिंग कार्यकारी अधिकारी म्हणून झाली होती.
फ्लॅग ऑफिसर कमांडिंग महाराष्ट्र नेव्हल एरिया म्हणून नेमणूक होण्यापूर्वी, दक्षिण विभाग नौदल मुख्यालयात कमांड मोहिमा अधिकारी, मुख्य स्टाफ अधिकारी, एनएव्हीसीसी (एएनसी), सह संचालक, संचालक आणि प्रधान संचालक, नौदल मोहिमा संचालनालय, संचालक, नौदल योजना संचालनालय, नौदल मुख्यालय आणि मुख्य स्टाफ अधिकारी (कार्यान्वयन), संरक्षण सेवा स्टाफ महाविद्यालय, वेलिंग्टन येथे ते कार्यरत होते.
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1782409)
Visitor Counter : 188