रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
भारतमाला परियोजना
Posted On:
16 DEC 2021 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2021
केंद्र सरकारने ऑक्टोबर, 2017 मध्ये सुमारे 34,800 किमी (10,000 किमी उर्वरित एनएचडीपी विस्तारांसह) एकूण लांबीसह भारतमाला परियोजनेचा पहिला टप्पा मंजूर केला होता. यासाठी अंदाजे 5,35,000.00 कोटी,रुपये खर्च अपेक्षित असून, सुमारे 9,000 किमी लांबीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर, सुमारे 6,000 किमी लांबीचा आंतर-कॉरिडॉर आणि फीडर रस्ते , राष्ट्रीय कॉरिडॉरच्या सुमारे 5,000 किमी लांबीच्या टप्प्याची कार्यक्षमता सुधारणे, सुमारे 2,000 किमी लांबीची सीमा आणि आंतरराष्ट्रीय भागाची कनेक्टिव्हिटी, सुमारे 2,000 किमी लांबीचे किनारपट्टी आणि बंदरांना जोडणारे रस्ते, सुमारे 800 किमी लांबीचा एक्सप्रेसवे या विकासकामांचा समावेश आहे.
भारतमाला परियोजन टप्पा -1 अंतर्गत आसामसह ईशान्येकडील राज्यांमध्ये 1,371 किमी लांबीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, त्यापैकी 27 किमी लांबीचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. राज्यनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहेतः
State
|
Total
|
Awarded
|
Length
(km)
|
Total Capital cost (Rs. in
Cr.)
|
Length
(km)
|
Total Capital cost (Rs. in Cr.)
|
Assam
|
512
|
15,523
|
225
|
10,635
|
Manipur
|
607
|
10,015
|
387
|
7,116
|
Meghalaya
|
128
|
2,218
|
128
|
2,218
|
Mizoram
|
361
|
6,370
|
361
|
6,370
|
Nagaland
|
193
|
3,398
|
193
|
3,398
|
Tripura
|
75
|
1,075
|
75
|
1,075
|
आसाम राज्यात 3 राष्ट्रीय महामार्ग (715K, 137 आणि 137G) घोषित करण्यात आले आहेत.
आसाम राज्यातील बदरपुरघाट-ममित मार्ग आणि सिलचर-कनैलबाजार मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केलेले नाहीत. कनेक्टिव्हिटीची आवश्यकता, अंतरिम प्राधान्य आणि निधीची उपलब्धता याच्या आधारे मंत्रालय वेळोवेळी महामार्गांची घोषणा करण्याबाबत विचार करते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1782274)
Visitor Counter : 286