आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 134 कोटी 61 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण
गेल्या 24 तासांत, कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 68 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या
देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.38% असून हा मार्च 2020 पासूनचा उच्चांकी दर आहे
गेल्या 24 तासांत देशात 6,984 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद
भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 87,562
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (0.67%) गेले 31 दिवस हा दर 1% हून कमी आहे
Posted On:
15 DEC 2021 9:49AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 15 डिसेंबर 2021
गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 68,89,025 मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 134 कोटी 61 लाखांचा (1,34,61,14,483) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 1,41,10,887 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, नागरिकांना आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे
HCWs
|
1st Dose
|
1,03,85,790
|
2nd Dose
|
96,15,068
|
FLWs
|
1st Dose
|
1,83,83,347
|
2nd Dose
|
1,67,16,936
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
48,14,22,451
|
2nd Dose
|
27,76,64,395
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
19,03,00,963
|
2nd Dose
|
13,55,74,432
|
Over 60 years
|
1st Dose
|
11,89,49,012
|
2nd Dose
|
8,71,02,089
|
Total
|
1,34,61,14,483
|
गेल्या 24 तासांत 8,168 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,41,46,931झाली आहे.
परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर 98.38% झाला असून हा मार्च 2020 पासूनचा उच्चांकी दर आहे.
केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 15,000 हून कमी असण्याचा कल आता गेले सलग 48 दिवस कायम आहे.
गेल्या 24 तासांत, 6,984 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 87,562 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.25% असून मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.
कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 11,84,883 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 65 कोटी 88 लाखांहून अधिक (65,88,47,816) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.67% असून गेले 31 दिवस हा दर 1%हून कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 0.59% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 72 दिवस 2% हून कमी आणि गेले सलग 107 दिवस 3% हून कमी राहिला आहे.
***
ST/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1781613)
Visitor Counter : 201