उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

चित्रपट केवळ मनोरंजन करणारे नसावेत तर त्यांनी युवा वर्गात उत्तम मूल्ये, नैतिकता आणि देशभक्तीही रुजवावी – उपराष्ट्रपती


उपराष्ट्रपतींनी ‘राज कपूर: द मास्टर अॅट वर्क’ या जीवनचरित्राचे प्रकाशन केले

Posted On: 14 DEC 2021 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2021

 

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज सांगितले की उत्तम चित्रपटाचा उद्देश केवळ मनोरंजन  करण्याचा असता कामा नये. युवा वर्गात उत्तम मूल्ये, नैतिकता आणि देशभक्ती रुजवतील  अशा चित्रपटांची निर्मिती करण्याचे त्यांनी चित्रपट निर्मात्यांना आवाहन केले.

प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक राहुल रवैल यांनी लिहिलेल्या ‘राज कपूर: द मास्टर अॅट वर्क’ या पुस्तकाचे नवी दिल्ली येथे प्रकाशन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना चित्रपट हे अधिक उत्तम कारणासाठी निर्माण व्हावेत आणि त्यांनी समाजातील जातीयवाद, भ्रष्टाचार, लिंगभेद तसेच गुन्हेगारीसारख्या वाईट प्रवृत्तींशी लढण्यासाठी आपल्या समाजातील युवकांना प्रेरित करावे या मुद्द्यावर उपराष्ट्रपतींनी अधिक भर दिला.

उपराष्ट्रपती नायडू म्हणाले की, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मूल्यांची घसरण होत असताना, राजकारणी व्यक्ती, माध्यमे आणि चित्रपट निर्माते यांच्यावर समाजासमोर आदर्श ठेवण्याची  आणि लोकांच्या कल्याणाचा व्यापक विचार करण्याची जबाबदारी आहे.

ते म्हणाले की चित्रपटांनी लोकांच्या, विशेषतः युवकांच्या मनात सकारात्मकता निर्माण केली पाहिजे. देशाच्या कल्याणाचा विचार मनात ठेवून चित्रपट निर्मिती करण्याचा सल्ला त्यांनी निर्मात्यांना दिला.

भारतीय चित्रपट जगभरात पहिले जातात याचा उल्लेख करून नायडू यांनी चित्रपट म्हणजे जगभरात स्थायिक भारतीयांना त्यांच्या मायदेशाशी जोडणारा महत्त्वाचा सांस्कृतिक दुवा झाला आहे याचा ठळक उल्लेख केला.

राज कपूर यांचा दूरदर्शी बुद्धिमान आणि अष्टपैलू अभिनेता असा उल्लेख करत, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू म्हणाले की, भारतीय चित्रपट उद्योगामध्ये राज कपूर यांचे मोठे  योगदान आहे.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1781504) Visitor Counter : 237