गृह मंत्रालय
काश्मीरमधे स्थलांतरीत मजूरांवर हल्ले
Posted On:
14 DEC 2021 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2021
स्थलांतरित मजुरांवरील कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था आणि गुप्तचर जाळे कार्यरत आहे.
याशिवाय, स्थलांतरित मजूर काम करतात/ राहतात त्या भागात दिवस-रात्र सुरक्षा, गस्त आणि अतिरेक्यांविरुद्ध कारवाई मोहिमा राबवल्या जात आहेत.
याव्यतिरिक्त, काश्मीरमधील स्थलांतरित मजुरांवर होणारा कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला होऊ नये या दृष्टीने चोवीस तास नाका तपासणी, मोक्याच्या ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा (रोड ओपनिंग पार्ट्या) विशेष सुरक्षा पथकं पुरेशा प्रमाणात वाढवली जात आहेत.
देशाच्या विविध भागांतून स्थलांतरित मजूर दरवर्षी एप्रिल/मे महिन्यात खोऱ्यात येतात आणि खोऱ्यातील मोसमी कामे पूर्ण करून हिवाळ्याच्या काळात त्यांच्या मूळ गावी परततात. हिवाळा संपल्यानंतर खोऱ्यात परतण्याची अपेक्षा असलेल्या स्थलांतरित मजुरांच्या सुरक्षिततेसाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.
गृह राज्यमंत्री श्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
N.Chitale/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1781476)
Visitor Counter : 225