सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

अनुसूचित जाती/अनुसूचित जमातींवरील अत्याचारांविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइनचा प्रारंभ


टोल-फ्री क्रमांक “14566” वर हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेत चोवीस तास उपलब्ध

Posted On: 13 DEC 2021 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2021

 

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण  मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज अत्याचारांविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन  (NHAA) सुरू केली.  हेल्पलाइन आता संपूर्ण देशभरात टोल-फ्री क्रमांक “14566” वर  हिंदी, इंग्रजी आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रादेशिक भाषेत चोवीस तास उपलब्ध आहे.

हेल्पलाइन क्रमांक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) [PoA] कायदा, 1989 ची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करेल आणि देशभरातील कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरच्या मोबाइल किंवा लँड लाइन नंबरवरून व्हॉईस कॉल / VOIP करून संपर्क  करता येऊ  शकतो. अत्याचार प्रतिबंध कायदा अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीच्या (एसटी)  सदस्यांवरील अत्याचार रोखण्याच्या प्रमुख उद्देशाने लागू करण्यात आला होता.

हेल्पलाइनबद्दल मूलभूत माहिती :

  • टोल फ्री सेवा.
  • देशभरातील कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरच्या मोबाइल किंवा लँड लाइन नंबरवरून "14566" वर व्हॉइस कॉल /VOIP करून संपर्क करता येऊ शकतो.   
  • सेवांची उपलब्धता : चोवीस तास
  • सेवा हिंदी, इंग्रजी आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रादेशिक भाषेत उपलब्ध असतील
  • मोबाईल ऍप्लिकेशन देखील उपलब्ध आहे.

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1780942) Visitor Counter : 222