सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

एमएसएमईना पुरविलेले आर्थिक पाठबळ

Posted On: 09 DEC 2021 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2021

एमएसएमई अर्थात केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील एनएसआयसी अर्थात राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ मर्या. हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम एमएसएमई उद्योगांच्या कच्च्या मालाची गरज पूर्ण करण्यासाठी मोठ्या निर्मात्यांकडून हा माल खरेदी करून तो एमएसएमईना पुरविण्याची व्यवस्था करत असते. एनएसआयसी त्यांच्या आरएमए अर्थात कच्चा माल मदत योजनेअंतर्गत पुरवठादारांच्या देयकासाठी बँक हमी घेऊन एमएसएमईना आर्थिक पाठबळ देखील पुरविते. एनएसआयसीतर्फे कच्चा माल मदत योजनेअंतर्गत एमएसएमईना गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत आणि विद्यमान वर्षात पुरविण्यात आलेल्या मदतीचे तपशील खाली दिले आहेत:

Financial year

No. of units supported

Credit support provided (Rs.in lakh)

2019-20

2842

524495.62

2020-21

2699

439843.75

2021-22

(upto 26.11.2021

2445

308303.03

एनएसआयसीतर्फे कच्चा माल मदत योजनेअंतर्गत बिहार आणि मध्य प्रदेशातील एमएसएमईना गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत आणि विद्यमान वर्षात (02.12.2021 पर्यंत) पुरविण्यात आलेल्या मदतीचे तपशील खाली दिले आहेत:

Financial Year

Bihar

Madhya Pradesh

 

No. of Unit

Credit support (Rs.in lakh)

No. of Unit

Credit support (Rs.in lakh)

2019-20

21

2058.17

82

15351.49

2020-21

20

2344.72

67

9791.60

2021-22 

(upto 02.12.2021)

19

1067.90

72

6099.27

केंद्रीय एमएसएमई मंत्रालय एमएसएमई क्षेत्राच्या प्रोत्साहनासाठी तसेच विकासासाठी विविध योजना आणि कार्यक्रम राबवीत असते. या योजना आणि कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना (पीएमईजीपी), पारंपरिक उद्योगांच्या पुनरुत्थानासाठी निधी योजना (एसएफयूआरटीआय), अभिनव संशोधन, ग्रामीण उद्योग आणि उद्योजकता योजना (एएसपीआयआरई), एमएसएमईला वाढीव कर्जासाठी व्याज अनुदान योजना, सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी कर्ज हमी योजना (सीजीटीएमएसई), सूक्ष्म आणि लघु उद्योग समूह विकास कार्यक्रम (एमएसई-सीडीपी), कर्जाशी निगडीत विशेष भागभांडवल अनुदान योजना (एससीएलसीएसएस) यांचा समावेश आहे. तसेच, आतापर्यंत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील 849 उद्योजकांना कर्जाशी निगडीत विशेष भागभांडवल अनुदान योजनेअंतर्गत 88.24 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

 

 

M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1779849) Visitor Counter : 182


Read this release in: English , Tamil