रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

51,165 किमी लांबीचे 484 रेल्वे प्रकल्प नियोजन/मंजुरी/अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात

Posted On: 08 DEC 2021 9:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2021

रेल्वे प्रकल्पांचा विस्तार राज्यांच्या सीमांपलीकडे असल्यामुळे रेल्वे प्रकल्प राज्यनिहाय मंजूर केले जात नाहीत  तर ते विभागीय रेल्वेनिहाय मंजूर केले जातात. 01.04.2021 पर्यंत, 51,165 किमी लांबीचे ,अंदाजे 7.53 लाख कोटी खर्चाचे  484 रेल्वे प्रकल्प,योजना/मंजुरी/अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत, त्यापैकी 10,638 किमी लांबीच्या प्रकल्पाचे  काम सुरू झाले आहे आणि या मार्च 2021 पर्यंत अंदाजे 2.14 लाख कोटी खर्च झाले आहेत.

यात खालील प्रकल्प समाविष्ट:-

  1. 4,05,916 कोटी खर्चाचे 21,037 किमी लांबीचे 187 नवीन रेलमार्ग  प्रकल्प, त्यापैकी 2,621 किमी लांबीचे काम पूर्ण झाले आहे.आणि मार्च, 2021 पर्यंत 1,05,591 कोटी रुपये खर्च झाला आहे.
  2. 53,171 कोटी खर्चाचे 6,213 किमी लांबीचे 46 गेज रूपांतरण प्रकल्प,,त्यापैकी 3,587 किमी लांबीचे काम पूर्ण झाले आहे.आणि मार्च, 2021 पर्यंत 1,05,591 कोटी रुपये  खर्च झाला आहे.
  3. 2,93,471 कोटी खर्चाचे 23,915 किमी लांबीचे 251 दुहेरीकरण प्रकल्प, त्यापैकी 4,430 किमी लांबीचे काम पूर्ण झाले आहे.मार्च, 2021 पर्यंत 86,041 कोटी रुपये खर्च झाला आहे.

किंमत,खर्च आणि परिव्यय यासह रेल्वे प्रकल्पांचे क्षेत्रीय रेल्वेनुसार तपशील हे भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावर सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिले आहेत.

केंद्रीय रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्‍णव यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

 

S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1779518) Visitor Counter : 188


Read this release in: English , Urdu