उपराष्ट्रपती कार्यालय

हेलिकॉप्टर अपघातात आज जनरल बिपिन रावत आणि इतरांच्या मृत्यूबद्दल उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक

Posted On: 08 DEC 2021 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2021

 

तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ,चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य कर्मचारी यांच्या दुःखद निधनाबद्दल उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या नायडू तीव्र शोक व्यक्त केला आहे.

शोकाकुल कुटुंबातील सदस्यांविषयी तीव्र संवेदना व्यक्त करताना, उपराष्ट्रपतींनी आज हैदराबाद येथील एका कार्यक्रमात अपघातामध्‍ये प्राण गमवावे लागलेल्या सर्वांना श्रद्धांजली म्हणून दोन मिनिटे मौन पाळण्याची विनंती केली. जनरल रावत यांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम करत, नायडू यांनी रावत यांच्या  निधनामुळे देशाची कधीही भरून न येणारी हानी झाली असल्याचे सांगितले आणि हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातामध्‍ये झालेली प्राणहानी ही एक मोठी शोकांतिका असल्याचे नमूद केले.

जनरल रावत यांच्‍यामध्‍ये असलेले  नेतृत्व गुण  आणि त्यांची दूरदृष्टी ठेवून कार्य  करण्याची पद्धत यासाठी देशातील जनता त्यांची कायम ऋणी राहील, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

 

  S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1779502) Visitor Counter : 195