गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

स्वच्छ भारत नागरी अभियानामुळे 2014 मध्ये महानगरपालिकांच्या घनकचऱ्यावरील शास्त्रीय प्रक्रियेचे प्रमाण 18% वरून वाढून 70% झाले

Posted On: 06 DEC 2021 9:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2021

स्वच्छ भारत नागरी अभियान सुरु झाल्यामुळे सर्व शहरांनी त्यांच्या महानगरपालिका क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, आतापर्यंत महानगरपालिकांच्या क्षेत्रातील घन कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे प्रमाण 18% वरून वाढून 70% झाले आहे. देशात शहरी भागात प्रक्रिया झालेल्या आणि न झालेल्या कचऱ्याचे तपशील परिशिष्टात दिले आहेत.  स्वच्छ भारत नागरी अभियानाअंतर्गत, भारत सरकार शहरी भागातील सर्व कचरा टाकण्याच्या मोठ्या जागांवर महानगरपालिका क्षेत्रातील कचऱ्याचे व्यवस्थापन, घनकचऱ्यावरील प्रक्रिया, बांधकाम तसेच तोडकाम यातून निर्माण होणारा कचरा यांचे व्यवस्थापन तसेच जैवप्रक्रिया यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अतिरिक्त केंद्रीय मदत पुरवीत असते. आतापर्यंत,स्वच्छ भारत नागरी अभियानाअंतर्गत घन कचरा व्यवस्थापनासाठी देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 6,375 कोटी 17 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीचा उपयोग, कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प, साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, शोष खड्डे इत्यादी सुविधा उभारण्यासाठी केला जात आहे. नुकत्याच 1 ऑक्टोबर 2021 पासून सुरु करण्यात स्वच्छ भारत नागरी अभियान 2.0 मध्य अभियानाच्या काळात मुख्यतः देशातील शहरांना कचरामुक्त करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रामध्ये शहरी भागात एकूण 22,401 मेट्रिक टन घन कचरा रोज निर्माण होत असून त्यापैकी 20,609 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते तर 1,792 मेट्रिक टन कचरा प्रक्रियेविना टाकला जातो आहे.

देशाच्या शहरी भागातील प्रक्रिया केलेल्या आणि न केलेल्या कचऱ्याचे राज्य/केंद्रशासित प्रदेश निहाय तपशील (प्रतिदिन मेट्रिक टन)

S. No.

States/UTs

Total Waste generation

(in MT/D)

Treated Waste

(in MT/D)

Untreated Waste

(in MT/D)

1

A&N Islands

55

47

8

2

Andhra Pradesh

6,063

4,123

1,940

3

Arunachal Pradesh

201

50

151

4

Assam

1,054

664

390

5

Bihar

4,734

852

3,882

6

Chandigarh

541

541

0

7

Chhattisgarh

1,650

1,650

0

8

Dadra & Nagar Haveli and Daman &Diu

54

47

7

9

Delhi

10,823

8,875

1,948

10

Goa

136

99

37

11

Gujarat

9,228

8,582

646

12

Haryana

5,316

3,934

1,382

13

Himachal Pradesh

326

326

0

14

Jammu & Kashmir

949

361

588

15

Ladakh

13

0

13

16

Jharkhand

1,978

1,266

712

17

Karnataka

6,158

4,064

2,094

18

Kerala

2,400

2,208

192

19

Madhya Pradesh

5,906

5,788

118

20

Maharashtra

22,401

20,609

1,792

21

Manipur

8

1

7

22

Meghalaya

1

0

1

23

Mizoram

196

2

194

24

Nagaland

119

0

119

25

Odisha

1,904

1,333

571

26

Puducherry

275

0

275

27

Punjab

4,054

2,392

1,662

28

Rajasthan

6,741

1,753

4,988

29

Sikkim

70

20

50

30

Tamil Nadu

12,464

6,606

5,858

31

Telangana

10,126

8,708

1,418

32

Tripura

326

176

150

33

Uttar Pradesh

14,861

11,592

3,269

34

Uttarakhand

1,553

870

683

35

West Bengal

7,876

788

7,088

Total

1,40,557

98,324

42,233

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

 

 

 

 

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1778641) Visitor Counter : 198


Read this release in: English , Tamil