सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

मैला सफाईकामातील धर्म आणि जात घटक

Posted On: 01 DEC 2021 5:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2021

असा कोणताही विशिष्ट अभ्यास करण्यात आलेला नाही. तथापि,मैला सफाई कामगारांच्या नोंदीसाठी एमएस अधिनियम, 2013 च्या तरतुदींनुसार सर्वेक्षण केले गेले आहे. या सर्वेक्षणांदरम्यान वरील कायद्यांतर्गत विहित केलेल्या निकषांनुसार 58,098 सफाई कामगारांची नोंद झाली आहे. नोंद झालेल्या सफाई कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, 43,797 सफाई कामगारांच्या संदर्भात जातीशी संबंधित माहिती (डेटा) उपलब्ध आहे. सफाई कामगारांच्या संख्येचे वर्गवार विभाजन खालीलप्रमाणे आहे.

Category

No. of Manual Scavengers

Scheduled Castes

42,594

Scheduled Tribes

421

Other Backward Classes

431

Other

351

त्यांच्या पुनर्वसनासाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक आरक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री.  रामदास आठवले यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

 

 

M.Chopade/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1776904) Visitor Counter : 155


Read this release in: English , Urdu , Telugu