अर्थ मंत्रालय
सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीला सरकारची मान्यता
Posted On:
29 NOV 2021 8:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 29 नोव्हेंबर 2021
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन जयराम गडकरी, केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती. निर्मला सीतारामन, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री जितेंद्र सिंह, यांचा समावेश असलेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या (CCEA) पर्यायी अधिकारप्राप्त यंत्रणेने (AM) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (सीईएल) मधील भारत सरकारच्या 100% समभागांच्या विक्रीसाठी मेसर्स नंदल फायनान्स अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्वोच्च किंमतीच्या निविदेला मान्यता दिली आहे. विजयी बोली 210,00,60000/- (रुपये दोनशे दहा कोटी साठ हजार फक्त) रुपये आहे.
सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड च्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया 27.10.2016 रोजी CCEA च्या ‘तत्त्वतः’ मान्यतेने सुरू झाली.
निविदा भरणाऱ्यांच्या गोपनीयतेचा विचार करून, आंतर-मंत्रिमंडळ गट (IMG), निर्गुंतवणुकीवरील सचिवांचा गाभा गट (CDG) आणि सर्वोच्च मंत्री स्तरावरील अधिकारप्राप्त पर्यायी यंत्रणेचा समावेश असलेल्या बहुस्तरीय निर्णयाद्वारे संपूर्ण निर्गुंतवणूक प्रक्रिया पारदर्शक रीतीने पारदर्शक रीतीने पार पाडली गेली आहे. व्यवहार सल्लागार, कायदेशीर सल्लागार, मालमत्तेचे मूल्यवर्धक जे त्यांच्या संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक आहेत अशा सर्वांनी संपूर्ण प्रक्रियेला पाठिंबा दिला आहे.
पुढची पायरी म्हणजे लेटर ऑफ इंटेंट (LoI) जारी करणे आणि नंतर शेअर खरेदी करारावर स्वाक्षरी करणे, ज्यानंतर, यशस्वी निविदा भरणारे, कंपनी आणि सरकार यांनी अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये हा व्यवहार पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
G.Chippalkatti/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1776411)
Visitor Counter : 269