अल्पसंख्यांक मंत्रालय
मदरशांच्या आधुनिकीकरण योजनेची अंमलबजावणी
Posted On:
29 NOV 2021 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2021
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने लागू केलेल्या मदरसे आणि अल्पसंख्यकांना शिक्षण देण्यासाठीच्या सर्वंकष योजनेत मदरशांमध्ये दर्जात्मक शिक्षण देण्याची योजना आणि अल्पसंख्यक शिक्षण संस्थांच्या पायाभूत सुविधा विकासाची योजना अशा दोन योजनांचा समावेश आहे. ही योजना नुकतीच अल्पसंख्यक मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने या योजनेअंतर्गत 2020-21 या वर्षात 21428.285 लाख रुपयांचा निधी वितरीत केला असून या योजनेअंतर्गत नेमणूक झालेल्या शिक्षकांचे मानधन देखील या रकमेत समाविष्ट आहे.
केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
* * *
G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1776293)