अल्पसंख्यांक मंत्रालय

मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती

Posted On: 29 NOV 2021 8:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 नोव्‍हेंबर 2021

 

केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाने नियमित आणि पूर्ण कालिक एम.फिल आणि पी.एच.डी. अभ्यासक्रमामध्ये शिकणाऱ्या शीख, बुद्ध, ख्रिश्चन, जैन, मुस्लीम, आणि पारशी या सहा वर्गीकृत अल्पसंख्यक समुदायांतील विद्यार्थी/उमेदवारांच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती (MANF)  योजना राबविली आहे. या योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये 1251 शिष्यवृत्त्या देण्यात आल्या तर 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत  607 शिष्यवृत्त्या देण्यात आल्या आहेत. या MANF योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीसाठी प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी पुरेशा संख्येने उपलब्ध झाले नाहीत तर ज्यांचा प्रवेश अजून निश्चित झालेला नाही अशा विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती धारकांची निवड केली जाते. शैक्षणिक वर्ष 2019-20 आणि 2020-21साठी शिष्यवृत्त्या मजूर झालेल्या विद्यार्थ्यांची राज्य आणि केंद्रशासित प्रदेश निहाय यादी परिशिष्टात दिली आहे. या दोन्ही वर्षांमध्ये मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेतून कोणत्याही तृतीयपंथी लाभार्थ्याला शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही.

केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाअंतर्गत मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्तीची अंमलबजावणी करणाऱ्या केंद्रीय अनुदान आयोगाच्या माहिती अहवाल प्रणालीद्वारे ज्यांनी एम.फिल आणि पी.एच.डी. अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत त्यांची माहिती संकलित केली जात नाही.

परिशिष्ट

The details of State/UT-wise fellowships sanctioned during the last two years i.e. 2019-20 and 2020-21 under Maulana Azad Fellowship Scheme

States/UTs

Total

ANDHRA PRADESH

7

ARUNACHAL PRADESH

7

ASSAM

53

BIHAR

44

CHANDIGARH (UT)

6

CHHATTISGARH

4

DELHI

130

GOA

2

GUJARAT

19

HARYANA

26

HIMACHAL PRADESH

11

JAMMU & KASHMIR

358

JHARKHAND

18

KARNATAKA

26

KERALA

230

LADAKH

7

MADHYA PRADESH

26

MAHARASHTRA

70

MANIPUR

20

MEGHALAYA

12

MIZORAM

5

NAGALAND

8

ODISHA

5

PUDUCHERRY (UT)

4

PUNJAB

114

RAJASTHAN

48

SIKKIM

10

TAMIL NADU

26

TELANGANA

14

TRIPURA

2

UTTAR PRADESH

343

UTTARAKHAND

17

WEST BENGAL

186

Grand Total

1858

* Provisional data; the NTA examination for December, 2020 is yet to be conducted.

 

*केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

* * *

G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1776258) Visitor Counter : 203


Read this release in: English , Urdu