अर्थ मंत्रालय
प्रादेशिक ग्रामीण बँकांनी 2018 ते 2021 या कालावधीत छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती/जमातींना निर्धारित कर्ज पुरवठ्याचे लक्ष्य ओलांडले आहे
Posted On:
29 NOV 2021 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2021
विशेषत: छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी आणि समाजातील दुर्बल घटकांना कृषी कर्जाचा पुरवठा करण्यात या बॅंका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत किसनराव कराड यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या प्राधान्य क्षेत्र कर्ज (PSL) संबंधी सुधारित मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या संदर्भात, समायोजित निव्वळ बँक कर्जाच्या (एएनबीसी) 18 टक्के किंवा ऑफ-बॅलन्स शीट एक्सपोजरच्या समतुल्य कर्ज (सीईओबीई)यापैकी जे जास्त असेल,ते लक्ष्य कृषी क्षेत्रासाठी देण्यासाठी विहित आहे, त्यापैकी 9 टक्के उद्दिष्ट छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे. प्राधान्य क्षेत्र कर्ज संबंधी मार्गदर्शक तत्वांमध्ये दुर्बल घटकांना कर्ज देण्यासाठी एएनबीसी किंवा सीईओबीईच्या 15% चे लक्ष्य निर्धारित आहे , ज्यामध्ये छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती/जमाती यांचा समावेश आहे असे ते म्हणाले.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, प्रादेशिक ग्रामीण बँकांनी 2018 ते 2021 या कालावधीत छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती/जमातींना निर्धारित कर्ज पुरवठ्याचे लक्ष्य पार केले आहे.
(Amount in ₹ crore)
As on
|
Loans Outstanding of RRBs
|
Total Loans Outstanding
|
Small & Marginal Farmers
|
Weaker Sections
|
Amount
|
Share (%)
|
Amount
|
Share (%)
|
31 Mar 2019
|
2,80,755
|
1,26,958
|
45.2
|
1,58,627
|
56.5
|
31 Mar 2020
|
2,98,214
|
1,43,103
|
48.0
|
1,78,659
|
59.9
|
31 Mar 2021
|
3,34,171
|
1,56,106
|
46.7
|
1,94,315
|
58.1
|
Source: NABARD
* * *
G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1776242)
Visitor Counter : 251