माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘कुम्पाचो दरेयो’ आपल्याला सांगतो, उंच भरारी घेवून आकाशाला स्पर्श करतानाही आपल्या मुळांशी प्रामाणिक रहा; कारण तुमचे गंतव्यस्थान तुमची मुळेच निश्चित करत असतात: 52 व्या इफ्फीमध्ये गोवा विभागाचे चित्रपट दिग्दर्शक हिमांशू सिंग यांचे मनोगत
‘‘जास्त पैसा कमाविण्यासाठी एखाद्याने चित्रपट बनविण्याऐवजी जास्त चित्रपट बनविण्यासाठी अधिक चित्रपट बनवावेत’’
पणजी, 27 नोव्हेंबर 2021
या जगामध्ये नवनवीन संधी निर्माण होत आहेत, आपण त्यादृष्टीने स्वतः मोठ्ठं बनत गेलो आणि अगदी आभाळाला स्पर्श करायला लागलो तरीही, आपण नेमके कुठून आलो आहोत, हे कायम स्मरणात ठेवले पाहिजे. आपण आपल्या मुळांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. गोव्यातल्या अतिशय रमणीय ग्रामीण भागात घडणारी ही मानवी आणि जॉय यांच्या अखेरच्या भेटीची ही कथा आहे. गोव्याचा निरोप घेऊन ‘हरित कुरणांच्या’ शोधात मुंबईला जाण्यापूर्वी घडणारे हळूवार प्रसंग यामध्ये चित्रीत करण्यात आले आहेत. चित्ररसिकांना हे भावस्पर्शी कथानक अधिकच हळवे करून गेले.
52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कुम्पाचो दरेयो यांचा हा 18 मिनिटांचा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. या कोकणी चित्रपटाने काही कालातीत प्रश्न उपस्थित केले आहेत. काही गोष्टींचे स्मरणही हा चित्रपट करून देतो. आपले स्वतःचे घर, आपलं गाव- ठिकाण यांचे कितीतरी मूल्य असते, आणि त्याकडे आपण सहजतेने दुर्लक्ष करतो, त्याला कमी लेखतो, हे या कलाकृतीतून दर्शवले आहे.
या लघुपटाचे दिग्दर्शन हिमांशू सिंग यांनी केले आहे. ही केवळ दोन व्यक्तिरेखांची- पात्रांची कथा असून ती प्रेक्षकांना आपल्याबरोबर अगदी सहजपणे बरोबर घेवून जाईल अशा घटनांची त्यामध्ये पेरणी केली आहे. वरवर सोप्या परंतु कठीण प्रश्नांच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना उत्तर देणे भाग पाडताना सुंदर मेळ साधला आहे.
या चित्रपट प्रदर्शनाच्या जोडीनेच आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सिंग यांनी चित्रपट आणि त्याची कथा यांमागचे तत्वज्ञान अधोरेखित केले.
या चित्रपटाचे निर्माते किशोर अर्जुन शिंदे असून अभिनेते रवी किशोर याने जॉय याची तर मानवीची भूमिका उगम जांबौलीकर हिने साकारली आहे. सिनेमॅटोग्राफर म्हणून अश्विन चिडे, कला दिग्दर्शक पंकज काटवारे, आणि निर्मितीपश्चात कामाचे पर्यवेक्षक म्हणून कार्तिक यांनी काम केले आहे. या मंडळींनीही यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.
महोत्सवातल्या गोवा विभागामध्ये या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर काल इफ्फीमध्ये झाला.
यावेळी बोलताना दिग्दर्शक सिंग यांनी सांगितले की, या चित्रपटातून आम्हाला एक महत्वाचा संदेश द्यायचा होता. ‘कुम्पाचो दरेयो - ए सी ऑफ क्लाउड्स’ मधून आम्हाला सांगायचे आहे की, तुम्ही खूप मोठे व्हा, अगदी उंच भरा-या घेवून आकाशाला स्पर्श केला तरीही तुम्ही आपल्या मूळांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. तुमचे गंतव्यस्थान तुमची मुळे ठरवत असते. सिंग म्हणाले, गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या एका भाषणातून प्रेरणा मिळाल्यामुळे या चित्रपटाची बीजे मनात पेरली गेली.
प्रादेशिक नॉन-फीचर फिल्मसना व्यासपीठ देण्याविषयी ओटीटी मंचाच्या भूमिकेबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवोदित दिग्दर्शक म्हणाले, ‘‘प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट बनवले जातात परंतु एखाद्याने जास्त पैसे कमाविण्याच्या हेतूने चित्रपट बनवू नयेत, तर जास्त चित्रपट बनविण्यासाठी म्हणून अधिक चित्रपट बनवावेत. माझ्यासारख्या युवा निर्मात्यांच्या नॉन फीचर फिल्मना ओटीटी मंचामुळे कमाई करण्याचे साधन उपलब्ध झाले तर नवोदित निर्मात्यांना मदत होईल. एकप्रकारे तो चांगला पाठिंबा असणार आहे.’’
* * *
Jaydevi PS/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775810)
Visitor Counter : 251