संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदल अकादमी 'एझिमला' चे शरदकालीन सत्र संपन्न

Posted On: 27 NOV 2021 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2021

 

भारतीय नौदल अकादमी (आयएनए ), एझिमाला येथे शनिवारी, 27 नोव्हेंबर 21 रोजी झालेल्या दिमाखदार दीक्षांत संचलनामध्ये (पीओपी ) भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रमाच्या 101 मिडशिपमन प्रशिक्षणार्थीं, 31 नौदल अभिमुखता अभ्यासक्रम (विस्तारित) आणि नौदल अभिमुखता अभ्यासक्रम (नियमित आणि तटरक्षक) च्या 33 प्रशिक्षणार्थींसह 231 सर्व प्रशिक्षणार्थींनी विशेष गुणवत्तेचे प्रदर्शन करून आपले प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण केले.

मालदीवच्या संरक्षण मंत्री श्रीमती मारिया अहमद दीदी यांनी संचलनाची पाहणी केली. संचलनानंतर त्यांनी गुणवंत मिडशिपमन आणि प्रशिक्षणार्थींना पदके बहाल केली. दक्षिण नौदल कमांडचे कमांडिंग-इन-चीफ ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अनिल कुमार चावला हे या दीक्षांत संचालनाचे संचालन अधिकारी होते.

भारतीय नौदल अकादमी बी.टेक अभ्यासक्रमासाठी ‘राष्ट्रपती सुवर्णपदक’ मिडशिपमन रंजन कुमार सिंग यांना प्रदान करण्यात आले. इतर पदक विजेते खालील प्रमाणे आहेत.

(अ) आयएनएसी बी.टेक अभ्यासक्रमासाठी सीएनएस रौप्य पदक - मिडशिपमन कविश कांकरान

(ब ) आयएनएसी बी.टेक अभ्यासक्रमासाठी एफओसी-इन-सी दक्षिण कांस्य पदक - मिडशिपमन स्वप्नील शिवम

(क) एनओसी (विस्तारित) साठी सीएनएस सुवर्ण पदक - प्रशिक्षणार्थी वरद एस शिंदे

(ड ) एनओसीसाठी एफओसी-इन-सी दक्षिण रौप्य पदक (विस्तारित)- प्रशिक्षणार्थी चिंतन छटबर

(इ ) कमांडंट, एनओसी (विस्तारित) साठी आयएनए कांस्य पदक - प्रशिक्षणार्थी राहुल राणा

(फ ) एनओसी (नियमित) साठी सीएनएस सुवर्ण पदक - प्रशिक्षणार्थी आवृत्ति भट्ट

(ग ) कमांडंट, एनओसी (नियमित) साठी आयएनए रौप्य पदक -प्रशिक्षरणार्थी सिमरन पी कौर

(हा ) सर्वोत्कृष्ट अष्टपैलू महिला प्रशिक्षणार्थीसाठी झामोरिन चषक - प्रशिक्षणार्थी आवृत्ति भट्ट

यशस्वी प्रशिक्षणार्थींनी आपल्या लखलखत्या तलवारी आणि रायफल घेऊन मानवंदना देत भारतीय नौदल अकादमीमध्ये आपल्या ‘अंतिम पग’ या अखेरच्या कार्यक्रमासाठी सर्व प्रशिक्षणार्थींसह पारंपरिक धूनच्या साथसंगतीने सर्व सहका-यांना निरोप दिला. यामध्ये सशस्त्र दलांचाही समावेश होता. या धूनच्या तालावर संथपणे अकादमीच्या क्वार्टरडेकसमोरून संचलन करण्यात आले.

मालदीवच्या संरक्षण मंत्री श्रीमती मारिया अहमद दीदी यांनी संचलनांमधील प्रशिक्षणार्थींचे त्यांचे बिनचूक संचलन , कसरत आणि संचलनामधील कवायतींबद्दल अभिनंदन केले.पुनरावलोकन अधिकाऱ्यांनी कर्तव्य, सन्मान आणि धैर्य या मूलभूत मूल्यांवर भर दिला. आणि इतर मान्यवरांनी उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणपूर्णतेचे पट्टे प्रदान केले. आणि कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. हे प्रशिक्षणार्थी आता वेगवेगळ्या जहाजांवर आणि देशाच्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये कार्य करणार आहेत.

अकादमीच्या वतीने कठोर खबरदारीचे उपाय योजून कोविड-19 दरम्यान प्रशिक्षणार्थींचे आव्हानात्मक प्रशिक्षण आणि भारतीय नौदल अकादमी येथे शरदकालीन सत्र 2021 यशस्वीपणे पूर्ण करण्यात अकादमीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1775720) Visitor Counter : 200


Read this release in: English , Urdu , Hindi