वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
"राष्ट्रीय एक खिडकी प्रणाली पोर्टलवर आता 18 केंद्रीय विभागांच्या मंजुऱ्या मिळणार आणि डिसेंबर 21 पर्यंत आणखी 14 केंद्रीय विभाग आणि 5 राज्ये जोडली जातील.”-पीयूष गोयल
इंडस्ट्रियल लँड बँक आता 17 राज्यांच्या जीआयएस प्रणालींशी जोडण्यात आली आहे, आयएलबीकडे 5.5 लाख हेक्टर जमिनीच्या क्षेत्रामध्ये नकाशासाठी मोजलेल्या 4,000 हून अधिक औद्योगिक पार्क्क्ससचा डेटाबेस आहे- गोयल
आत्मनिर्भर भारत आणि व्यवसाय सुलभतेमुळे नव्या भारताला बळ मिळेल - पीयूष गोयल
भारताला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सरकारचा 5 सूत्री दृष्टिकोन : उद्देश, समावेशकता, नावीन्यपूर्ण संशोधन, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक"
“जगासाठी- भारतात कल्पना आखा, अभिनव संशोधन करा आणि भारतात निर्मिती करा – ”, उद्योग क्षेत्रासाठी संदेश
Posted On:
27 NOV 2021 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2021
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की आपल्याला पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा करण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील. ‘आत्मनिर्भर भारतासाठी व्यवसाय सुलभता ’ या विषयावरील सीआयआय राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना गोयल म्हणाले की, आत्मनिर्भर भारत आणि व्यवसाय सुलभतेमुळे नव्या भारताला बळ मिळेल.
“पंतप्रधानांनी अव्वल 50 मध्ये स्थान मिळवण्याबद्दल केलेल्या आवाहनामुळे आपल्या सर्वांचा -सरकार आणि उद्योगांचा दृष्टीकोन बदलला ,” असे ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान आपल्याला हळूहळू पुढे नेत आहेत, - 50 हे मी पहिल्या सत्रात ठरवलेले प्रारंभिक लक्ष्य होते. आता तुम्हाला अधिक महत्त्वाकांक्षी व्हावे लागेल ,तुम्ही अव्वल 25 मध्ये असायला हवे असे गोयल म्हणाले.
"अव्वल 40 देश हे "अत्यंत विकसित देश आहेत त्यांना छेद देणे आणि त्यांच्यापेक्षा उत्तम कामगिरी करणे हे मोठे आव्हान आहे आणि तेच आपल्याला पेलायचे आहे"' असे गोयल म्हणाले.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775674)
Visitor Counter : 199