माहिती आणि प्रसारण मंत्रालय
तुमच्या हातून गोष्टी सुटायला लागल्यानंतर तुम्ही परिपूर्ण बनत जाता:- 52 व्या इफ्फी दिग्दर्शक ग्युलिओ मुसी यांच्या ‘ह्युमनायझेशन’ चे प्रदर्शन
जीवनाच्या अर्थाचा शोध घेणा-या रंजक स्वीडिश चित्रपटाचा प्रीमियर
पणजी, 25 नोव्हेंबर 2021
आयुष्यात येत असलेल्या अनेक चढ-उतारांना तोंड देता आले नाही, त्यामुळे जीवनाचा अंत करायला गेलेली या चित्रपटाची नायिका –अॅना त्यातही अयशस्वी ठरते. आणि त्याच क्षणी आता जीवनापासून लांब पळण्याऐवजी जे सामोरे येईल, त्याला तोंड देण्याचा निर्णय घेते. आयुष्यात ‘टिकून राहण्यासाठी’ मृत्यूपेक्षाही जास्त वेदनादायक प्रस्तावाला सामोरी जाते. चित्रपटामध्ये अॅनाची सुश्रुषा करणारा हाइम तिला एका खास कामगिरीसाठी घेऊन जातो आणि या नव्या, गूढ मार्गावर तिला मुक्त वाटायला लागते.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये म्हणजेच 52 व्या इफ्फीमध्ये स्वीडिश चित्रपट ‘ह्युमनायझेशन’चा जागतिक प्रीमियर झाला. निर्माते ग्युलिओ मुसी यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपट रसिकांना त्यांच्या या चित्रपटातल्या अॅनाबरोबर तिच्या वेदनामय प्रवासात सहभागी होण्याची संधी मिळाली. इफ्फीच्या जागतिक पॅनोरमा विभागात या चित्रपटाचे प्रदर्शन झाले.

यावेळी दिग्दर्शक मुसी यांनी चित्रपट प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. चित्रपटामागच्या तात्विक गोष्टींचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, ‘‘माणूस असण्यामध्ये नेमके काय अंतर्भूत आहे, माणूस म्हणून ती व्यक्ती वास्तवामध्ये कशी आहे, स्वतःला ती निर्माण कशी करते, अशा तात्विक चर्चा या चित्रपटात होते. प्रसिद्ध स्वीडिश कलाकार लुईस -हाइम यांनीही यावेळी प्रतिनिधींशी चर्चा केली.

चित्रपट कथेची गरज लक्षात घेवून ध्वनिमुद्रणाची आणि मिश्र दृश्यांचा मेळ घालताना विशेष काळजी घेण्यात आल्याचे मुसी यांनी सांगितले. कथेतल्या अॅनाला भोगाव्या लागणा-या यातनांचे भीषण वास्तव आणि तिच्या अस्तित्वातल्या दुःखांचे अस्सल चित्रण करण्यासाठी वेगळा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अॅनाची काळजी घेणा-या परिचारकाची भूमिका अभिनेता लुईस -हाइम याने केली आहे. इफ्फीच्या जागतिक प्रीमियरमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन होत असल्याबद्दल लुईस याने आनंद व्यक्त केला.
* * *
Jaydevi PS/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775346)