माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सरकारी अधिकार्यांकडून कामे करून घेण्याची ताकद किंवा आवाज नसलेल्या भारतातील प्रत्येक सामान्य नागरिकाला “अॅक्ट -1978” चित्रपट समर्पित : इफ्फी 52 मध्ये चित्रपट दिग्दर्शक मंजुनाथ एस. यांनी साधला संवाद
"मला आदर हवा आहे" ही नायिका गीता यांनी संपूर्ण सरकारी यंत्रणेला दिलेली हाक आहे
Posted On:
25 NOV 2021 8:05PM by PIB Mumbai
पणजी, 25 नोव्हेंबर 2021
लोकांच्या सेवेसाठी सरकारे अस्तित्वात असतात, परंतु अनेकदा सामान्य नागरिकाला त्याला आवश्यक असलेली सेवा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. एकामागून एक कार्यालयांचे दरवाजे ठोठावावे लागतात. याच संदर्भातला दिग्दर्शक मंजुनाथा एस. यांचा 'अॅक्ट -1978', हा कन्नड चित्रपट. सरकारी यंत्रणेचा हा त्रासदायक अनुभव अनेक असहाय सामान्य नागरिकांच्या अनुभवाशी मिळताजुळता आहे.
"मला माझा चित्रपट भारतातील प्रत्येक सामान्य पुरुष आणि स्त्रीला समर्पित करायचा आहे, ज्यांच्याकडे सरकारी अधिकार्यांच्या हातून कामे करून घेण्याची ताकद किंवा आवाज नाही." इफ्फी 52 मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिग्दर्शक मंजुनाथा एस.बोलत होते.
महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागातल्या चित्रपट गटातला हा चित्रपट आहे.
हा चित्रपट प्रेक्षकांना प्रशासकीय यंत्रणा आणि नोकरशाहीतील त्रुटींमधून बाहेर पडण्यासाठी एका सामान्य महिलेच्या संघर्षात सहभागी होण्यासाठी आवाहन करत असल्याचं दिग्दर्शकानं सांगितलं.
सशक्त आणि प्रश्न उपस्थित करणारा चित्रपट निर्माण करण्याची प्रेरणा वैयक्तिक अनुभवातून मिळाल्याचे दिग्दर्शकाने सांगितले.
अॅक्ट -1978 या चित्रपटाच्या शीर्षकातूनच या चित्रपटाचा संदर्भ कर्नाटक नागरी सेवा कायदा 1978 मध्ये असल्याचे सूचित होते.
हा चित्रपट नोकरशाहीच्या घृणास्पद आणि स्वार्थी वृत्तीवर केलेले बेधडक आणि जहाल भाष्य आहे.
मन्सोर उर्फ मंजुनाथ सोमकेशा रेड्डी हे कन्नड चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्याचा पहिला चित्रपट 'हरिवू' (2014) ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता तर 'नाथिचारामी' (2018) चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित झाला आहे.
* * *
Jaydevi PS/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775127)
Visitor Counter : 238