माहिती आणि प्रसारण मंत्रालय
'स्वीट बिर्याणी' चित्रपट फूड डिलिव्हरी बॉयचे जीवन आणि त्याच्यावर झालेला भावनिक आघात कथन करतो : 52 व्या इफ्फीमध्ये IFFI52 मध्ये दिग्दर्शक के. जयचंद्र हाश्मी
चित्रपटकार न्यायाधीश नाहीत, त्यांना फक्त समस्या सुटायला हवी आहे: हाश्मी
पणजी, 25 नोव्हेंबर 2021
एक प्रसिद्ध वाक्य आहे, ज्यात म्हटले आहे, 'कलेने त्रासलेल्यांना दिलासा आणि सुखवस्तूंना अस्वस्थ केले पाहिजे'. मला वाटते, जात, वर्ग आणि इतर प्रमाणभूत मापदंडाच्या माध्यमातून सुखवस्तू जीवन जगणाऱ्या लोकांना हा चित्रपट अस्वस्थ करू करू शकतो. भारतीय पॅनोरमा कथा -बाह्य चित्रपट स्वीट बिर्याणीचे दिग्दर्शक के. जयचंद्र हाश्मी यांनी आज गोव्यात 52 व्या इफ्फीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत हे मत व्यक्त केले.
पत्रकारांना संबोधित करताना, हाश्मी म्हणाले की, ही कथा एक फूड डिलिव्हरी करणारा मुलगा 'मारिमुथू' आणि एका दिवसभरात त्याला आलेल्या अनुभवांची आहे. मागवण्यात आलेले अन्नपदार्थ वितरित करण्यासाठी अन्न पदार्थांच्या भरपूर भरपूर पॅकेटसह तो निघाला आहे, त्याच दरम्यान ज्यांच्याकडे खायला अन्न नाही असे एक कुटुंब वाटेत त्याला भेटते ,मात्र त्याच्याकडील अन्नपदार्थ त्या कुटुंबाला खायला देण्यासाठी तो असहाय्य आहे. हेच व्यंग चित्रपटात मांडले आहे.
या चित्रपटात फूड डिलिव्हरी बॉयचे दैनंदिन जीवन आणि त्याच्यासमोर निर्माण होणारी आव्हाने ,ज्याची ग्राहक फारशी दखल घेत नाहीत आणि सहानुभूतीही दाखवत नाहीत. हे अधोरेखित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या चित्रपट निर्मितीच्या शैलीबद्दल बोलताना, दिग्दर्शक म्हणाले, चित्रपट बनविणारे न्यायाधीश नाहीत आणि त्यांना फक्त समस्या सुटायला हवी आहे.
मारिमुथूची भूमिका साकारणारा अभिनेता सरिथिरन आणि आणि चित्रपटाचे संकलक गौथम जी.ए. यांनीही यावेळी त्यांचे अनुभव सांगितले. प्रेक्षकांच्या खास विनंतीवरून मोठ्या प्रमाणात प्रशंसा झालेल्या स्वीट बिर्याणीमधील मारिमुथूप्रमाणे सरिथिरन व्यासपीठावर थिरकले.
स्वीट बिर्याणी
(भारतीय पॅनोरमा कथा-बाह्य चित्रपट श्रेणी)
दिग्दर्शक आणि निर्माते यांच्याविषयी : के. जयचंद्र हाश्मी 2009 पासून लघुपट बनवत आहेत.ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक सीनू रामासामी यांचे सहाय्यक दिग्दर्शक होते. त्यांच्या काही पुरस्कार विजेत्या चित्रपटांमध्ये ‘मौना मोझी’, ‘आराम’, ‘कलावू’ आणि ‘टू-लेट’ यांचा समावेश आहे.
कलाकार आणि चित्रपटाशी संबंधित अन्य
दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा: के. जयचंद्र हाश्मी
छायाचित्रण दिग्दर्शक : प्रवीण बालू
संकलक : गौथम जी.ए.
कलाकार : सरितिरन, बालाजी वेणुगोपाल, सुमथी, दीपन, निव्या, अहमब्रो, थेलीपन
* * *
Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775100)
Visitor Counter : 238