पंतप्रधान कार्यालय
आंध्र प्रदेशच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात पंतप्रधानांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला
Posted On:
19 NOV 2021 6:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्याशी, राज्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल संवाद साधला. केंद्र सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे.
पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे,
“आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री @ysjagan Garu यांच्याशी राज्याच्या काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल बोललो. केंद्र सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सर्व जण सुरक्षित आणि निरोगी राहावेत, यासाठी मी प्रार्थना करतो.”
Jaydevi PS/M.Pange/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775075)
Visitor Counter : 148