आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती
Posted On:
25 NOV 2021 9:30AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 119 कोटी 38 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
रोगमुक्ती दर सध्या 98.33% आहे;मार्च 2020 पासूनचा हा सर्वात उच्चांकी दर आहे
गेल्या 24 तासांत 10,264 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण कोविडमुक्त रुग्णांची संख्या वाढून ती 3,39,67,962 इतकी झाली आहे
गेल्या 24 तासांत 9,119 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली
भारतात सध्या 1,09,940 कोविड सक्रीय रुग्ण, ही गेल्या 539 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या
देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1% हून कमी असून सध्या हे प्रमाण 0.32% इतके आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सध्या (0.79%) गेले 52 दिवस हा दर 2% हून कमी
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या (0.90%) गेले 62 दिवस हा दर 2% हून कमी
देशात आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 63 कोटी 59 लाख चाचण्या करण्यात आल्या
****
RA/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774941)