माहिती आणि प्रसारण मंत्रालय

1990च्या दशकानंतरचा सोव्हिएत युक्रेनचे दर्शन मला या चित्रपटाच्या माध्यमातून घडवायचे होते- ‘-हायनो’चे दिग्दर्शक ओलेह सेन्टसोव्ह

Posted On: 24 NOV 2021 7:20PM by PIB Mumbai

पणजी, 24 नोव्‍हेंबर 2021 

 

‘‘माझा चित्रपट खूप हिंसक आणि निष्ठूरही आहे. मला या चित्रपटाच्या माध्यमातून 1990च्या दशकानंतर ज्या पद्धतीने युक्रेनमध्ये जंगली जीवन जगले जात होते, त्याचे चित्रण करायचे होते,’’ असे मनोगत ‘-हायनो’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ओलेह सेन्टसोव्ह यांनी आज व्यक्त केले. 52 व्या इफ्फीमध्ये जागतिक पॅनोरमा चित्रपटांच्या विभागामध्ये  ‘-हायनो’चे प्रदर्शन झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ओलेह बोलत होते.

‘‘मी आधी स्वतःच बरेच काही शिकलो आणि नंतर खूप उशिराने चित्रपट निर्मितीकडे वळलो. आयुष्य छोटसे आहे आणि मला चित्रपट बनवत जगायची इच्छा आहे, असेही ओलेह यावेळी म्हणाले. त्यांच्या‘-हायनो’ चित्रपटाचा 52व्या इफ्फीमध्ये काल अशियाई प्रिमियर झाला. हा चित्रपट याआधी व्हेनिस चित्रपट महोत्सव 2021 मध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘-हायनो’ चित्रपटाच्या टीमचा एक भाग असणा-या वेरोनिका वेल्च यांनीही यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, सोव्हिएत महासंघाचे पतन हा विषय स्थानिक असल्यामुळे जगभराल्या प्रेक्षकांना हा चित्रपट कसा समजेल, याचा आम्हाला अंदाज नव्हता. परंतु कला लोकांना जोडते. मानवी आयुष्यात आपल्या समोर येणारे पर्याय आणि आपल्या सभोवतालचे वातावरण यांचा मेळ घालण्याचे काम सगळीकडे आणि सर्वांना करावे लागते. त्याचबरोबर त्या परिस्थितीवर आपले किती नियंत्रण आहे, हा प्रश्नही नेहमीच सर्वांपुढे असतो.’’

‘-हायनो’ मध्ये हिंसाचाराचा अतिरेक झाल्याचे दिसून येते, याविषयी बोलताना ओलेह म्हणाले, ‘‘ वास्तविक गुन्हेगारीवरील सिनेमा-नाटकांचा मला तिटकारा आहे. हिंसाचाराचा मी तिरस्कारही करतो. परंतु हा चित्रपट वास्तववादी असावा, अशी माझी इच्छा होती.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘आजच्या पिढीला नव्वदीच्या दशकामध्ये युक्रेनमधले जीवन कसे होते, हे दाखविण्याचा प्रयत्न मी या चित्रपटातून केला आहे.’’

वेरोनिका वेल्च पुढे म्हणाल्या, ‘‘आजच्या तरूणांना समाज माध्यमातून जे दिसते तेच जीवन वास्तविक नाही आणि आपल्याला सभ्य जीवन जगता यावे यासाठी कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे, हे या चित्रपटातून तरूणांना शिकविण्याचा प्रयत्न केला आहे.’’

सिनेमाविषयी -

ही एक भुरट्या चोराची कथा आहे.  ‘-हायनो’ असे टोपणनाव धारण करणारा तरूण 1990 दशकामध्ये युक्रेनच्या गुन्हेगारी जगतामध्ये झपाट्याने वर चढत गेला. गेंड्यांकडे फक्त अतिशक्ती असते. आणि ते तितकेच क्रूरही असतात. त्याच्याकडे गमावण्यासारखे काहीच नसते. अखेर त्याची या दुष्टचक्रातून सुटका होवून मुक्ती मिळेल का? अशी संधी मिळेल का? याचे चित्रण केले आहे.

* * *

Jaydevi PS/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1774764) Visitor Counter : 23


Read this release in: Punjabi , English , Urdu , Hindi