आदिवासी विकास मंत्रालय

आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत साप्ताहिक सोहळ्याचा भाग म्हणून आदिवासी विकास मंत्रालयाकडून दक्षिणेकडील राज्यांमधील 86 अनुसूचित जमातीच्या उद्योजकांचा सत्कार

Posted On: 23 NOV 2021 7:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2021

आदिवासी जमातीतील उद्योजकतेला चालना मिळावी तसेच यशस्वी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राष्ट्रीय अनुसुचीत जमाती निधी व विकास महामंडळ (NSTFDC) व भारत सरकारच्या आदिवासी विकास मंत्रालयाने 22 नोव्हेंबर 2021 रोजी आंध्र प्रदेशाच्या TRICOR च्या संयुक्त विद्यमाने एका भव्य सोहळ्यात आदिवासी उद्योजकांचा सत्कार केला. हा सोहळा विशाखापट्टणम येथे पार पडला.

हा कार्यक्रम भारताच्या स्वातंत्र्याचे 75वे वर्ष साजरा करणाऱ्या ‘आजादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमाचा भाग होता. आजादी का अमृतमहोत्सव हा, प्रागतिक भारताची 75 वर्षे, समृद्ध भारतातील लोकांचा, संस्कृतीचा तसेच कामगिरीचा इतिहास साजरा करण्यासाठीचा भारत सरकारचा उपक्रम आहे.

हा उपक्रम भारताच्या प्रगतीपथावरील यशस्वी मार्गक्रमणेत सामील झालेल्या एवढेच नव्हे तर भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला साकार करण्याचे सामर्थ्य व क्षमता असलेल्या भारतीय जनतेलाच समर्पित आहे.

हा कार्यक्रम भारत सरकारच्या आदिवासी विकास मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत साजऱ्या केलेल्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 15 नोव्हेंबरला अर्थात ‘जनजातीय गौरव दिवस’ या भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी पार पडला. अविश्रांत प्रयत्न आणि आदिवासी बांधवांच्या कल्याणाच्या उद्देशाने विविध आर्थिक योजनांच्या द्वारे आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या शाश्वत रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या महामंडळाच्या उद्दिष्टानुसार आदिवासी मंत्रालय व राष्ट्रीय अनुसुचीत जमाती निधी व विकास महामंडळ (NSTFDC) यांनी आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, ओदिशा या दक्षिणेकडील राज्यांमधील 86 अनुसूचित जमातीच्या उद्योजकांचा सत्कार केला. या सत्कारमूर्ती उद्योजकांमध्ये विविध उद्यमक्षेत्रात उद्योग सुरू करून यशस्वी झालेल्या महिलांचा लक्षणीय सहभाग होता. या भव्य सोहळ्यात झालेल्या सत्कारामुळे सत्कारमूर्ती उद्योजक भारावून गेले होते.

 

 

G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1774328) Visitor Counter : 182


Read this release in: Telugu , English , Hindi