संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची बांगलादेशच्या सशत्र सैन्य दिनाच्या निमित्ताने बांगलादेश उच्चायुक्तालयाला भेट
Posted On:
22 NOV 2021 10:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2021
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी बांगलादेशच्या सशस्त्र सैन्यदल दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथील बांग्लादेश उच्चायुक्तालयाला आज म्हणजेच, 22 नोव्हेंबर 2021 रोजी भेट दिली. दर वर्षी 21 नोव्हेंबर रोजी बांग्लादेशाचा सशस्त्र सैन्यदल दिन साजरा केला जातो. बांगलादेशचे उच्चायुक्त मोहम्मद इमरान, इतर मित्र देशांचे राजदूत आणि मिशन प्रमुख, बांगलादेशचे सैन्य अधिकारी आणि युद्ध लढलेले ज्येष्ठ सैनिक आणि अधिकारी या वेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्यदले आणि भारत सरकारच्या वतीने बांग्लादेशच्या सैन्यदलांचे अभिनंदन केले. तसेच, शांतता आणि सुरक्षिततेसाठीच्या त्यांच्या भविष्यातील मोहिमांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
"हे वर्ष भारत- बांगलादेश दरम्यानच्या संबंधांसाठी अत्यंत महत्वाचे आहे कारण हे वर्ष बांग्लादेश मुक्तीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. भारत बांग्लादेश यांच्यातील राजनैतिक संबंधांनाही यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. आणि वंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांचे ही जन्मशताब्दी वर्ष आहे. या अविस्मरणीय वेळी, मी 1971 मध्ये मुक्तीबाहिनीने मुक्ती युद्धामध्ये - बांगलादेश मुक्ती युद्धात दाखविलेल्या शौर्याला सलाम करतो. मुक्ती युद्धाचा जोश आजच्या बांगलादेशच्या सैन्याचे प्रेरणास्थान आहे,” असे ते म्हणाले.
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774088)
Visitor Counter : 230