ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
अनिवार्य बीआयएस मानकांचे उल्लंघन करून प्रेशर कुकर विक्रीचा प्रस्ताव देणाऱ्या ई-कॉमर्स संस्थांना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून नोटीस
गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या बनावट वस्तूंची विक्री रोखण्यासाठी प्राधिकरणाची देशव्यापी मोहीम
Posted On:
22 NOV 2021 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2021
'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव'- या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या बनावट वस्तूंची विक्री रोखण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली आहे.
या संदर्भात, प्राधिकरणाने आधीच देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांना अशा वस्तूंच्या उत्पादन किंवा विक्रीशी संबंधित अनुचित व्यापार पद्धती आणि ग्राहक हक्कांच्या उल्लंघनाबाबत तपास करण्याचे निर्देश जारी केले आहेत. हेल्मेट, प्रेशर कुकर आणि स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ही, दैनंदिन वापरातील अत्यावश्यक उत्पादने मोहिमेसाठी निश्चित केली गेली आहेत.
याखेरीज केंद्र सरकारने 21 जानेवारी 2020 रोजी, बीआयएस कायदा 2016 कलम 16 (1) अंतर्गत जारी केलेल्या घरगुती प्रेशर कुकर (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2020 चे उल्लंघन करून प्रेशर कुकरची विक्री करताना आढळलेल्या ई-कॉमर्स संस्थांविरुद्ध प्राधिकरणाने स्वतःहून दखल घेतली आहे. या आदेशानुसार, घरगुती प्रेशर कुकरच्या उत्पादनांना भारतीय मानक IS 2347: 2017 चे पालन करणे आणि 1 ऑगस्ट 2020 पासून बीआयएसच्या परवान्याखाली मानक चिन्ह धारण करणे बंधनकारक आहे.
ग्राहक संरक्षण कायदा, 2019च्या कलम 2(10)अन्वये, "दोष" म्हणजे गुणवत्ता, प्रमाण, सामर्थ्य, शुद्धता किंवा मानक यातील कोणतेही दोष, अपूर्णता किंवा कमतरता जी कोणत्याही कायद्याद्वारे किंवा अंतर्गत काही काळासाठी राखली जाणे आवश्यक आहे, किंवा सक्तीने किंवा कोणत्याही कराराच्या अंतर्गत, व्यक्त किंवा निहित किंवा कोणत्याही वस्तू किंवा उत्पादनाच्या संबंधात व्यापाऱ्याने केलेल्या कोणत्याही प्रकारच्या दाव्यानुसार "दोषपूर्ण" अभिव्यक्ती त्यानुसार काढली जाईल.
अशाप्रकारे, अनिवार्य मानकांचे पालन न करणारे प्रेशर कुकर या कायद्यांतर्गत 'दोषपूर्ण' मानले जातील .
G.Chippalkatti/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774031)
Visitor Counter : 253