माहिती आणि प्रसारण मंत्रालय
हेमा मालिनी यांना भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान
पणजी, 20 नोव्हेंबर 2021
समाजातील विविध स्तरांमधील चित्रपट रसिकांच्या अनेक पिढ्यांना आपल्या सौदर्यांने आणि अभिनयाने भुरळ घालणाऱ्या या दिग्गज अभिनेत्रीने हा पुरस्कार स्वीकारताना, इतका प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल महोत्सवाचे आभार मानले. या वर्षाचा भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व 2021 हा पुरस्कार स्वीकारत असताना मला अतिशय आनंद होत आहे, असे त्या म्हणाल्या.
तरुण आणि उदयोन्मुख प्रतिभावंतांच्या प्रतिभेला न्याय देण्यासाठी ‘उद्याचे 75 सर्जनशील प्रतिभावंत’ या स्पर्धेच्या माध्यमातून करत असलेल्या प्रयत्नांबद्दल या ज्येष्ठ अभिनेत्रींनी इफ्फीची प्रशंसा केली. आपल्या सर्जनशील तरुणांना या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाच्या माध्यमातून प्रोत्साहन देऊन इफ्फी अतिशय उल्लेखनीय कार्य करत आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी 52व्या इफ्फीमधील मुख्य परीक्षक इराणी चित्रपट निर्माते रखशान बेनीतेमाद आणि चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक स्टीफन वुली, चित्रपट निर्माते सीरो ग्वेरा, विमुक्ती जयसुंदरा आणि नीला माधव पंडा यांच्यासह परीक्षक मंडळांमधील इतर सदस्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
याशिवाय या सोहळ्यामध्ये इंडियन पॅनोरमा आणि इफ्फीसोबतच आयोजित करण्यात आलेल्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवाच्या परीक्षकांचा देखील एका छायाचित्रांच्या कोलाजद्वारे परिचय करून देण्यात आला.
* * *
Jaydevi PS/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773670)
Visitor Counter : 192