आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड - 19 अद्ययावत माहिती
Posted On:
21 NOV 2021 10:39AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2021
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत 116.50 कोटी कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.30 टक्के आहे; मार्च 2020 पासून हा दर सर्वात अधिक
गेल्या 24 तासात बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 12,329 पर्यंत वाढल्याने कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,39,22,037
गेल्या 24 तासामध्ये 10,488 नव्या रूग्णांची नोंद
भारतातील सक्रिय रूग्णसंख्या 1,22,714 गेल्या 531 दिवसांतील सर्वात कमी
सक्रिय रुग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या सध्या एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. सध्या हा दर 0.36 टक्के आहे. मार्च 2020 पासून हा दर सर्वात कमी
दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी दर (0.98%) इतका असून गेल्या 48 दिवसांपासून हा दर 2 टक्के पेक्षा कमी
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.94%) इतका आहे, गेल्या 58 दिवसांपासून हा दर 2 टक्क्यांपेक्षा कमी
आत्तापर्यंत एकूण 63.16 कोटी चाचण्या करण्यात आल्या
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773646)