माहिती आणि प्रसारण मंत्रालय

52व्या इफ्फीमध्ये India@75 अंतर्गत भारतीय सिनेमाच्या वैभवाचे दर्शन घडवून साजरा होणार भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

Posted On: 19 NOV 2021 9:51PM by PIB Mumbai

पणजी, 19 नोव्‍हेंबर 2021 


भारतीय सिनेमाच्या वैभवाचे दर्शन घडवण्यासाठी आणि साजरे करण्यासाठी 52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात India@75 या बॅनरखाली देशभरातील निवडक उत्तम 18 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी सध्या सुरु असलेल्या देशव्यापी कार्यक्रमांचा एक भाग म्हणून याचे आयोजन होणार आहे.

या चित्रपटांमध्ये महान चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांचा आगंतुक, एस. एस वासन यांचा चंद्रलेखा, विजय आनंद यांचा गाईड, तपन सिन्हा यांचा काबुलीवाला, डॉ. राजकुमार यांचा संध्या रागा, राज कपूर यांचा श्री420, के बालचंदर यांचा थनीर थनीर तसंच बाबू बँड बाजा, कासव यांचा समावेश आहे. भारताच्या समृद्ध चित्रपट परंपरेचे आणि विविधतेचे दर्शन घडवणारे हे चित्रपट आहेत.

India@75 अंतर्गत पुढील चित्रपटांचा समावेश आहे.:

अनु.

चित्रपट

दिग्दर्शक

वर्ष

भाषा

1

आगंतुक

सत्यजित राय

1991

बंगाली

2

अंधाधुन

श्रीराम राघवन

2019

हिंदी

3

बाबू बँड बाजा

राजेश पिंजानी

2011

मराठी

4

बेट्टडा हावू

एन. लक्ष्मीनारायण

1985

कन्नड

5

चंद्रलेखा

एस एस वासन

1948

तमिळ

6

चिदंबरम

जी. अरविंदन

1985

मलयाळम

7

एगी कोना

बॉबी वाहेम्बगंम आणि मयपक्सना हरोम्बगंम

2019

मणीपुरी

8

गाईड

विजय आनंद

1955

हिंदी

9

जोयमोती

मंजू बोरा

2006

आसामी

10

काका मुत्ताई

एम मणीकंदन

2014

तमिळ

11

काबुलीवाला

तपन सिन्हा

1957

बंगाली

12

कासव

सुमित्रा भावे

2015

मराठी

13

एयरलिफ्ट

राज कृष्ण मेनन

2016

हिंदी

14

संध्या रागा

डॉ. राजकुमार

1966

कन्नड

15

सागर संगमम

के विश्वनाथ

1983

तेलुगु

16

श्री420

राज कपूर

1955

हिंदी

17

सुजाता

बिमल रॉय

1959

हिंदी

18

थनीर थनीर

के बालचंदर

1981

तमिळ

 

* * *

Jaydevi PS/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1773376) Visitor Counter : 176


Read this release in: Urdu , English , Hindi