राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

Posted On: 18 NOV 2021 8:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2021

भारताचे राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांनी गुरू नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त देशवासियांना  शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपतींनी एका संदेशात म्हटले आहे की, गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त, मी सर्व भारतीयांना विशेषत: भारतातील  आणि परदेशात स्थायिक झालेल्या शीख समुदायाला हार्दिक शुभेच्छा देतो.

गुरूनानक यांनी दिलेला प्रेमाचा, करुणेचा आणि त्यागाचा संदेश  आणि आणि दिलेली शिकवण  मानवजातीच्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करते . त्यांचे विचार आपल्याला आपल्या जीवनात शांती आणि बंधुत्वाच्या आदर्शांचे अनुकरण करण्यास प्रोत्साहित करतात. गुरु नानक देव यांनी एका साध्या गृहस्थाचे जीवन जगताना, ‘एक ओंकार सतनाम, कर्ता पुरख’ प्राप्त करण्याचे साधन म्हणून मानवतेच्या सेवेवर भर दिला.

आपण सर्वांनी गुरू नानक देवजी यांच्या  पावलावर पाऊल ठेवून आपल्या समाजात सौहार्द  आणि एकात्मतेची भावना बळकट करू या.''

राष्ट्रपतींचा संदेश हिंदीत पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1773062) Visitor Counter : 218


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi