अल्पसंख्यांक मंत्रालय
करतारपूर लंघा संघर्ष समिती, श्री अमृतसर, पंजाबच्या शिष्टमंडळाने श्री करतारपूर मार्गिका पुन्हा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले
Posted On:
17 NOV 2021 9:03PM by PIB Mumbai
श्री करतारपूर लंघा संघर्ष समिती, श्री अमृतसर, पंजाब येथील शिष्टमंडळाने आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंग लालपुरा यांची भेट घेतली आणि श्री करतारपूर मार्गिका पुन्हा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानणारे निवेदन सादर केले.

शिख पंथात गुरुद्वारा श्री दरबार साहिब करतारपूर (पाकिस्तान) याला मोठे महत्त्व असल्याचे शिष्टमंडळाने त्यांच्या निवेदनात नमूद केले. शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देवजी यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटची 18 वर्षे करतारपूर येथे शीख धर्माचा प्रचार करत व्यतीत केली. देशाच्या फाळणीनंतर, शीख पंथ आणि नानक नाम लेवा संगतांनी श्री गुरू नानक देव यांच्या शेवटच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. 70 वर्षांपासून या संगतकडून केली जात असलेली प्रार्थना आणि त्यांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन कर्तारपूर मार्गिका केंद्र सरकारच्या पुढाकाराने पुन्हा खुली करण्यात आली होती. 9 नोव्हेंबर 2019 रोजी भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. दुर्दैवाने, कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे,ही मार्गिका 16 मार्च 2020 रोजी बंद करण्यात आली होती. तेव्हापासून, शीख संगत कर्तारपूर मार्गिका पुन्हा सुरू करण्यासाठी आग्रही होत्या.
गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त करतारपूर मार्गिका पुन्हा सुरू केल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे 19 नोव्हेंबर 2021 रोजी श्री गुरू नानक देवजींच्या जयंतीनिमित्ताने आनंद आणि उत्साह वाढेल.ही मार्गिका अखंड सुरू राहील आणि योग्य ती व्यवस्था केली जाईल आणि श्री करतारपूर साहिबला भेट देणाऱ्या जास्तीत जास्त यात्रेकरूंसाठी सरकारकडून योग्य व्यवस्था केली जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1772755)