दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दूरसंचार सचिव के राजारामन यांची दूरसंचार अभियांत्रिकी केंद्राला भेट
दूरसंचार उत्पादनांच्या खरेदीसाठीच्या सार्वजनिक खरेदी धोरण (मेक इन इंडिया) पोर्टलचे अनावरण
Posted On:
16 NOV 2021 9:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2021
दूरसंचार विभागाचे सचिव आणि डिजिटल कम्युनिकेशन कमिशनचे अध्यक्ष के. राजारामन यांनी आज दूरसंचार अभियांत्रिकी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी दूरसंचार उत्पादनांच्या खरेदीसाठी तयार केलेल्या सार्वजनिक खरेदी धोरण (मेक इन इंडिया) पोर्टलचे अनावरण केले. या पोर्टलवर उत्पादक, व्यापारी किंवा इतर संबंधित व्यक्ती तक्रारीं नोंदवू शकतील व तक्रारींची दखल घेतल्याचा माग घेऊ शकतील.
दूरसंचार अभियांत्रिकी केंद्राला के. राजारामन यांनी आज भेट दिली. त्यांच्यासोबत डिजिटल कम्युनिकेशन कमिशनचे (सेवा) सदस्य दिपक चतुर्वेदी आणि दूरसंचार विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
'दूरसंचार क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज डोमेनमध्ये त्यांचा उपयोग' या विषयावरील इंटरनेट ऑफ थिंग्ज चा तांत्रिक अहवाल, 'भारतीय दूरसंचार जाळ्यातील ऑप्टिकल फायबर आणि केबल' या विषयावरील स्थानिक दूरसंचार अभियांत्रिकी केंद्रांचा कन्सेप्ट पेपर तसेच दूरसंचार अभियांत्रिकी केंद्रांच्या विभागाने तयार केलेल्या 'तंत्रज्ञान विषयक हॅंडबूक 2021' यांचे अनावरण के. राजारामन यांनी केले.
त्यानंतर, दूरसंचार अभियांत्रिकी केंद्राच्या आवारातील MTCTE हेल्पडेस्क आणि इव्हॅल्युएशन सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर अँड कंट्रोल लॅबचे उद्घाटन सुद्धा यांच्या हस्ते झाले. यावेळी दूरसंचार अभियांत्रिकी केंद्राचे सदस्य आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
दूरसंचार सचिवांनी यावेळी दूरसंचार अभियांत्रिकी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना दाद दिली आणि मानकांची आखणी/तपशील किंवा उत्पादनांसाठी मार्गदर्शक सूचना देताना विविध संबंधितांच्या दृष्टिकोनाचा एकत्रित विचार करून ग्राहकांचे हितरक्षण आणि आवश्यकता ध्यानात घेऊन आखलेल्या सर्वांगीण दृष्टिकोनाचे महत्व विशद केले.




Jaydevi PS /V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1772420)
अभ्यागत कक्ष : 212