ऊर्जा मंत्रालय

'ऊर्जा क्षेत्रात ऊर्जा संचयनाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक धोरण आराखड्याच्या अहवालावर' चर्चा करण्यासाठी केंद्रीय उर्जा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Posted On: 11 NOV 2021 9:05PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय उपक्रम, नवीकरणीय ऊर्जा विकासक, पीएसपी विकासक आणि बॅटरी उत्पादक यांच्याबरोबर  ऊर्जा क्षेत्रात  ऊर्जा संचयनाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक  धोरण आराखड्याच्या अहवालावर चर्चा  करण्यात आली.

ऊर्जेचा अपव्यय होणार  नाही हे सुनिश्चित  करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्व ऊर्जा साठवून ठेवण्याच्या स्थितीत असणे आवश्यक आहे, जी कोणत्याही वेळी अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध होऊ शकेल यावर त्यांनी  भर दिला.

चोवीस तास नवीकरणीय ऊर्जा सुनिश्चित करण्यासाठी ऊर्जा निर्मितीतसाठवणूक केलेल्या  उर्जेची भर घालणे आवश्यक असल्याचे सिंह यांनी सांगितले. ऊर्जा साठा आणि पुरेशा संसाधनांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

2030 पर्यंत 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, सौर आणि पवन प्रकल्पांमधील आगामी ऊर्जा निर्मितीच्या अनुषंगाने वर्षनिहाय साठवण क्षमतेची गरज किती आहे याचा अभ्यास करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1771054) Visitor Counter : 196