आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील कोविड -19 प्रतिबंधक लसींच्या उपलब्धतेबाबत अद्ययावत माहिती
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या 116 कोटींपेक्षा अधिक मात्रा पुरविण्यात आल्या
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही लसींच्या 15.2 कोटीपेक्षा जास्त शिल्लक मात्रा उपलब्ध
Posted On:
04 NOV 2021 12:11PM by PIB Mumbai
देशभरातल्या कोविड–19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरूवात झाली. जास्त लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची पूर्वसूचना देण्यात आली आहे, जेणेकरून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींची पुरवठा साखळी सुरळीत राखता येईल.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसींच्या मोफत मात्रा देऊन केंद्र सरकार सहकार्य करीत आहे. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्यात केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांकडून 75 % लसींची खरेदी करेल, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांचा (मोफत) पुरवठा केला जाईल.
VACCINE DOSES
|
(As on 4thNovember 2021)
|
SUPPLIED
|
1,16,21,77,965
|
BALANCE AVAILABLE
|
15,20,94,556
|
केंद्र सरकारने आतापर्यंत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना 116 कोटींपेक्षा जास्त (1,16,21,77,965) लसींच्या मात्रा विनामूल्य तसेच राज्यांद्वारे थेट खरेदी प्रक्रियेच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे 15.2 कोटीपेक्षा (15,20,94,556) जास्त न वापरलेल्या मात्रा अजूनही शिल्लक आहेत.
***
M.Pange/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1769405)
Visitor Counter : 154