संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एक्स युध्द अभ्यास: समारोप समारंभ

प्रविष्टि तिथि: 30 OCT 2021 10:15PM by PIB Mumbai

 

भारतीय आणि अमेरिकी लष्कराच्या एक्स युद्ध अभ्यास 2021 या भारत-अमेरिकी संयुक्त युध्द सरावाच्या 17 व्या आवृत्तीचा अलास्का येथील एल्मेंडॉर्फ रिचर्डसन येथील संयुक्त तळावर  29 ऑक्टोबर 2021 ला समारोप करण्यात आला. परस्परांच्या लष्करी परिचालन प्रक्रिया, युध्दकौशल्ये यांच्याशी परिचित होणे तसेच आंतर-कार्यक्षमता विकसित करणे या उद्देशाने हा 14 दिवसांचा युध्द सराव आयोजित करण्यात आला होता. यात सहभागी झालेल्या भारतीय तुकडीत मद्रास रेजिमेंटच्या पायदळ बटालियन गटाचे 350 सैनिक तसेच अमेरिकेतर्फे सहभागी झालेल्या तुकडीत 40 व्या कॅव्हलरी रेजिमेंटच्या फर्स्ट स्क्वाड्रन (हवाई)च्या 300 जवानांचा समावेश होता.

हा युध्द सराव दोन टप्प्यांमध्ये पार पडला. पहिल्या टप्प्यात दोन्ही देशांच्या तुकड्यांनी युध्दजन्य परिस्थिती आणि युध्दनीतीविषयक प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या टप्प्यात दोन्ही तुकड्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा ग्राह्यता टप्प्यात सराव घेण्यात आला. दोन्ही तुकड्यानी

संयुक्तपणे प्रमाणीकरण सरावात भाग घेतला, त्यामध्ये युद्धजन्य निशाणेबाजी, रॅपलिंग आणि त्वरित प्रतिसाद पथकांच्या हेलिकॉप्टर आधारित हालचाली यांचा समावेश होता. या सरावासाठी भारतीय आणि अमेरिकी सैनिकांचा समावेश असलेल्या मिश्र तुकड्यांच्या कंपन्या तयार करण्यात आल्या होता आणि ग्राह्यता सरावासाठी डोंगरांमध्ये लपून असलेल्या शत्रूवर धाड तसेच महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण अशा कार्यांचा समावेश होता.

या सरावादरम्यान दोन्ही देशांच्या लष्करांनी परस्परांकडून पलटण आणि कंपनी स्तरावरील युध्दकार्यांसाठी कौशल्य आणि अनुभव मिळविला. या सरावामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांचा परस्परांवरील विश्वास तसेच एकमेकांसोबत मोहीम पार पडण्याची क्षमता दृढ झाली आणि दोन्ही देशांच्या तुकड्यांमध्ये सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे शक्य झाले.

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1767988) आगंतुक पटल : 636
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी