आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडील कोविड -19 प्रतिबंधक लसींच्या उपलब्धतेबाबत अद्ययावत माहिती
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 111.13 कोटींपेक्षा अधिक मात्रा पुरविण्यात आल्या
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 12.73 कोटींपेक्षा अधिक शिल्लक मात्रा उपलब्ध
Posted On:
30 OCT 2021 10:25AM by PIB Mumbai
देशभरातल्या कोविड–19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरूवात झाली. अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची पूर्वसूचना दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींची पुरवठा साखळी सुरळीत राखता येईल.
देशव्यापी लसीकरण अभियानाचा भाग म्हणून केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा पुरवत आहे. कोविड-19 लसीकरण अभियानाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्यात केंद्र सरकार, देशातल्या लस उत्पादकांकडून उत्पादित 75 % लसी खरेदी करून त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवत आहे.
VACCINE DOSES
|
(As on 30thOctober 2021)
|
SUPPLIED
|
1,11,13,97,185
|
BALANCE AVAILABLE
|
12,73,62,006
|
केंद्र सरकारने आतापर्यंत 111.13 कोटींपेक्षा जास्त (1,11,13,97,185) लसींच्या मात्रा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना मोफत आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे 12 कोटी 73 लाखापेक्षा जास्त (12,73,62,006) न वापरलेल्या मात्रा अजूनही शिल्लक आहेत.
***
N.Chitale/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1767869)
Visitor Counter : 170