दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

दूरसंचार नियंत्रक कार्यालय, महाराष्ट्र आणि गोवा यांनी मुंबईत जुहू चौपाटी येथे पदयात्रा आणि स्वच्छता मोहिमेचे केले आयोजन


दक्षता जनजागृती सप्ताह 2021 आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पदयात्रा आणि स्वच्छता मोहीम

स्वतंत्र भारत@75: प्रामाणिकपणासह आत्मनिर्भरता ही दक्षता जनजागृती सप्ताह 2021 ची संकल्पना आहे

Posted On: 28 OCT 2021 7:53PM by PIB Mumbai

मुंबई,  28 ऑक्टोबर 2021

दक्षता जनजागृती  सप्ताह 2021 आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, संचार नियंत्रक कार्यालय, महाराष्ट्र आणि गोवा, संचार मंत्रालय, भारत सरकार यांनी आज मुंबईतील जुहू चौपाटी येथे पदयात्रा आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या (टीएसपी) प्रतिनिधींसह नियंत्रक कार्यालयातील सर्व अधिकारी या जनजागृती उपक्रमात सहभागी झाले होते.

जुहू दूरसंचार संकुल येथून  अनिल प्रतापराव साळुंके, नियंत्रक (महाराष्ट्र आणि गोवा) यांनी दुपारी 4.30 वाजता सहनियंत्रक  सतीश कुमार, आणि उपनियंत्रक गौरव राऊत  यांच्या उपस्थितीत या पदयात्रेला हिरवी झेंडा दाखवला. कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून नियोजित  मार्गावरून पदयात्रा  निघाली. पदयात्रेदरम्यान अधिकाऱ्यांनी दक्षता, दूरसंचार ग्राहक संरक्षण आणि सायबर सुरक्षा याविषयी जनजागृती करणाऱ्या विविध घोषणा देत संदेश आणि 'चित्रांचे फलक झळकावले.

पदयात्रेचा समारोप जुहू समुद्रकिनाऱ्यावर  झाला आणि सर्व सहभागींनी दक्ष भारतासाठी एकत्र काम करण्याची गरज अधोरेखित करणारी अखंडतेची शपथ घेतली.  अनिल प्रतापराव साळुंके, नियंत्रक (महाराष्ट्र आणि गोवा) यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि प्रामाणिकपणा आणि सचोटीचा सर्वोच्च दर्जा राखण्याचा तसेच  या डिजिटल युगात सायबर सुरक्षेबाबत ग्राहक जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचा संदेश दिला.

त्यानंतर, अधिकारी  जुहू चौपाटी  येथील स्वच्छता मोहिमेत उत्साहाने सहभागी झाले आणि स्वच्छ भारत आणि स्वतंत्र भारत @ 75: सचोटीसह आत्मनिर्भरता हा संदेश दिला, जी दक्षता जागरुकता सप्ताह 2021 ची संकल्पना  आहे. सामान्य जनतेनेही अधिकाऱ्यांना सक्रियपणे पाठिंबा देत स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.

पदयात्रा आणि स्वच्छता मोहीम सर्व सहभागींमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात यशस्वी  झाली आणि दूरसंचार नियंत्रक कार्यालय  (महाराष्ट्र आणि गोवा), दूरसंचार सेवा पुरवठादार  आणि मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आवश्यक मदतीने दक्षता आणि दूरसंचार ग्राहक जागरूकता सारख्या महत्त्वाच्या बाबींवर जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य केले.

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1767310) Visitor Counter : 124


Read this release in: English