संरक्षण मंत्रालय
भारत-ब्रिटन दरम्यान 'कोकण शक्ती 2021' या पहिल्या त्रि-सेवा सरावाचा सागरी टप्पा पूर्ण जोमात
Posted On:
26 OCT 2021 7:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2021
भारत आणि ब्रिटनच्या सशस्त्र दलांदरम्यान 'कोकण शक्ती 2021' या पहिल्या त्रि-सेवा सरावाचा सागरी टप्पा अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर आयोजित करण्यात आला आहे. बंदर नियोजनाचा टप्पा पूर्ण झाल्यावर, सरावाचा सागरी टप्पा 24 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू झाला. तो 27 ऑक्टोबर 2021 पर्यंत चालेल.
पूर्व-नियुक्त ठिकाणी लष्कराच्या भू-सैन्यांना उतरवण्यासाठी समुद्रात नियंत्रण साध्य करण्याच्या उद्देशाने सर्व सहभागी युनिट्सना दोन विरोधी सैन्यात विभागले होते. एका दलाचे नेतृत्व पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग करत होते आणि त्यात आयएनएस चेन्नई , भारतीय नौदलाच्या इतर युद्धनौका आणि रॉयल नेव्हीचे टाइप 23 फ्रिगेट एचएमएस रिचमंड यांचा समावेश होता. यूके कॅरियर स्ट्राइक ग्रुप अंतर्गत कार्यरत अन्य दलात विमानवाहू जहाज, एचएमएस क्वीन एलिझाबेथ, ब्रिटन आणि नेदरलँडची इतर नौदल जहाजे आणि भारतीय युद्धनौका यांचा समावेश होता.
दोन्ही दलांनी त्यांच्या गटांमध्ये सागरी मार्गावर कर्मचारी आणि अन्य सामुग्रीची अदलाबदल, हवेत लढाऊ विमानांद्वारे (MiG 29Ks आणि F35Bs) हल्ले , हेलिकॉप्टरचे क्रॉस कंट्रोल (सी किंग, चेतक आणि वाइल्डकॅट), समुद्रातील युद्धसदृश स्थितीत मार्गक्रमण , हवेतील लक्ष्यांवर बंदुकीच्या फैरी यांसारखे सराव केले. लष्करी तुकड्यांचे सिम्युलेटेड इंडक्शन देखील करण्यात आले, त्यानंतर संयुक्त कमांड ऑपरेशन सेंटरची स्थापना करण्यात आली. त्यानंतर, दोन्ही दले हवाई आणि पृष्ठभागावरील सरावांसाठी समुद्रात भेटले.
हवाई हल्ल्यांमध्ये भारतीय सागरी गस्ती विमान (एमपीए) डॉर्नियर, भारतीय नौदल (मिग 29 के), रॉयल नेव्ही (एफ35बी) आणि भारतीय वायुसेना (एसयू-30 आणि जग्वार्स) च्या लढाऊ विमानांचा तसेच संयुक्त फ्लाय पास्ट यांचा समावेश होता. रॉयल नेव्हीद्वारे संचलित, भारतीय स्कॉर्पीन श्रेणीची पाणबुडी आणि पाण्याखालील रिमोट कंट्रोल वेहिकल EMATT सह पाण्याच्या पृष्ठभागाखाली रात्रभर सराव करण्यात आला. भारताचे P8I सागरी गस्ती विमान देखील सरावात सहभागी झाले होते.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1766728)
Visitor Counter : 565