गृह मंत्रालय
राजभाषा विभागाचे संमेलन आणि पुरस्कार सोहळ्याचे गोव्यात आयोजन
केंद्रीय पर्यटन, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांची संमेलनासाठी राहणार उपस्थिती
Posted On:
21 OCT 2021 7:18PM by PIB Mumbai
पणजी, 21 ऑक्टोबर 2021
पश्चिम तसेच मध्य विभागातील केंद्र सरकारी कार्यालये, बँका तसेच सरकारी उपक्रमांसाठी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वतीने 22 ऑक्टोबर 2021 ला गोव्यात मडगाव येथील रवींद्र भवनात संयुक्त विभागीय राजभाषा संमेलनाचे तसेच पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक या संमेलनाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी राजभाषेसंदर्भात उत्कृष्ट कार्य करणारी केंद्र सरकारी कार्यालये, बँका तसेच सरकारी उपक्रमांना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते विविध विभागातील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला, केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाच्या सचिव अन्शुली आर्य तसेच संयुक्त सचिव डॉ. मीनाक्षी जॉली यांच्यासह केंद्र सरकारचे अनेक अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
राजभाषा हिंदीच्या प्रचार-प्रसाराच्या उद्देशाने केंद्र सरकारचा राजभाषा विभाग प्रत्येक आर्थिक वर्षात चार विभागीय संमेलने आयोजित करत असते. कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांत या संमेलनांचे आयोजन होऊ शकले नाही, मात्र वर्ष 2021-22 मधील पहिले संमेलन गोव्यात आयोजित केले आहे.
राजभाषा विभागातर्फे माहिती प्रसारण प्रणालीच्या माध्यमातून राजभाषा कार्यान्वयन समित्यांचे अहवाल विभागाकडे सादर करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीची सुरुवात करण्यात आली आहे. आणि त्या अंतर्गत प्रत्येक राजभाषा कार्यान्वयन समितीला युझर आयडी अर्थात वापरकर्ता ओळख आणि पासवर्ड अर्थात सांकेतिक शब्द उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यांचा वापर करून प्रत्येक समिती संकेतस्थळावर लॉग इन करून कामाची यादी, कार्य अहवाल इत्यादी सर्व आवश्यक माहिती राजभाषा विभागाला ऑनलाईन पद्धतीने पाठवते. या माहितीच्या आधारे समित्यांच्या कामाचे मूल्यांकन करून पुरस्कारासाठी विजेते निश्चित केले जातात. गोवा येथे होत असलेल्या संमेलनात राजभाषेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र तसेच ढाल देऊन सन्मानित करण्यात येईल.
SRT/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1765550)
Visitor Counter : 216