वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची पहलगामला भेट, पंचायती राज संस्था आणि उद्योजकांच्या प्रतिनिधींशी चर्चा
Posted On:
18 OCT 2021 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2021
केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज पहलगामला भेट दिली.
यावेळी पशुपालन, जिल्हा उद्योग, एकात्मिक बाल विकास सेवा, बागकाम, मेंढीपालन, हातमाग आणि हस्तकला इत्यादी विभागांसह इतर विभागांनी उभारलेल्या विविध लहान दुकानांना भेट देऊन केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचे परीक्षण केले.
या दुकानांतील अधिकाऱ्यांशी चर्चा करतानाच केंद्रीय मंत्री गोयल यांनी दुकानात मांडलेल्या विविध उत्पादनांची थोडक्यात माहिती घेतली. या उत्पादनांच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल देखील त्यांनी चौकशी केली. या केंद्रशासित प्रदेशाची निर्यात क्षमता वाढवू शकणाऱ्या उत्पादनांना अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. स्थानिक उद्योजक आणि कारागिरांची निर्मितीक्षमता वाढविण्यासाठी शक्य असलेली सर्व मदत करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले.
केंद्रीय मंत्र्यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ योजने अंतर्गत परिसरातील नवजात मुलींना बेबी किट्सचे वितरण देखील केले. लाडली बेटी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मदत अनुदान वितरीत करण्यात आले. दुग्ध व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट गाड्या विकत घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना त्यांनी मंजुरी पत्रांचे वाटप देखील केले. समाज कल्याण विभागाच्या उपक्रमातून गोयल यांनी दिव्यांग व्यक्तींना तिचाकी सायकलींचे वितरण देखील केले.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर भेटीवर असून ते तेथील विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत.
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1764816)
Visitor Counter : 183