आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

राज्ये/केंद्रशासित प्रदेशात कोविड-19 लस उपलब्धतेविषयीची अद्ययावत माहिती


राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनां आतापर्यंत 98.88 कोटींपेक्षा अधिक लसी देण्यात आल्या

सध्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे 8.89 कोटी लसी शिल्लक

Posted On: 14 OCT 2021 9:42AM by PIB Mumbai

कोविड-19 लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती देशभरात आणखी वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. लसीकरणाचा सध्याचा टप्पा 21 जून 2021 रोजी सुरु झाला. अधिक लसी उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण मोहिमेची गती अधिक वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना, लसींचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, या दृष्टीने त्यांना लसींची उपलब्धता आणि पुरवठ्याबाबत आगावू कल्पना दिली जात आहे.

राष्ट्रव्यापी कोविड लसीकरणाचा भाग म्हणून केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना, मोफत कोविड लसी पुरवत आहे. सार्वत्रिक लसीकरण मोहिमेच्या सध्याच्या टप्प्यात, केंद्र सरकार एकूण उपलब्ध लसींपैकी, 75 टक्के लसी उत्पादकांकडून विकत घेऊन, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवत आहे.

 

VACCINE DOSES

 

(As on 14thOctober 2021)

 

SUPPLIED

 

98,88,80,235

 

BALANCE AVAILABLE

 

 

8,89,08,435

 

आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 98.88 कोटी लसींचा (98,88,80,235) पुरवठा करण्यात आला आहे. सध्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे 8.89 कोटी लसींचा (8,89,08,435) साठा उपयुक्त आहे.

****

SRupe/RAghor/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1763807) Visitor Counter : 196