दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
गोवा टपाल विभागातर्फे पुरुषोत्तम काकोडकर आणि मोहन रानडे या अज्ञात नायकांवरील विशेष लिफाफ्याचे प्रकाशन
Posted On:
13 OCT 2021 7:23PM by PIB Mumbai
पणजी, 13 ऑक्टोबर 2021
राष्ट्रीय टपालतिकिट संग्रह (फिलाटेली) दिन आणि स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आझादी का अमृतमहोत्सव या उपक्रमाचे औचित्य साधत गोवा टपाल विभागाने पुरुषोत्तम काकोडकर आणि मोहन रानडे या अज्ञात नायकांवर दोन विशेष कव्हर प्रकाशित केले. गोवा विभागाच्या पणजीच्या टपाल कार्यालयाचे पोस्टमास्तर एस एफ रिझवी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते आज रोजी प्रकाशित झालेली ही कव्हर्स पणजी मुख्य टपाल कार्यालयात 13.10.2021 पासून विक्रिला उपलब्ध आहेत.

पणजीच्या टपाल भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला पुरुषोत्तम काकोडकरांचे पुतणे परिंद काकोडकर, मोहन रानडेंचे जवळचे सहकारी ताम्हाणे, गोवा टपाल कार्यालयाच्या गोवा विभागाचे वरिष्ठ अधिक्षक सुधीर जी जाखेरे, गोवा इतिहासकार आणि गोवा टपालतिकिट संग्राहक व नाणी- टपाल तिकिट अभ्यासक संस्थेचे [GPNS] सेक्रेटरी आश्लेष कामत, पुरुषोत्तम काकोडकर व मोहन रानडेंचे नातेवाईक आणि टपाल कर्मचारी उपस्थित होते.
पणजीच्या पोस्टमास्तर एस एफ एच रिझवी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात युवापिढीच्या शिक्षणाचे माध्यम म्हणून टपालतिकिट संग्रहाचे असलेले महत्व विशद केले. स्वातंत्र्यसैनिकांचे संस्मरण हे नव्या पिढीला त्यांच्या विचारांनी भारुन टाकण्यासाठी आवश्यक असल्याचे सुधीर जाखेरे यांनी कार्यक्रमाची ओळख करून देताना सांगितले. गोव्याचे इतिहासकार संजीव सरदेसाई यांनी या कार्यक्रमात गोवा स्वातंत्र्यसंग्रामाबद्दल विस्तृत विवेचन केले. गोवा टपालतिकिट संग्राहक व नाणी , टपालतिकिट अभ्यासक संस्थेचे आश्लेष कामत यांनी गोवा राज्यातील टपाल तिकीट संग्रह कार्याचा भविष्यकालीन वेध घेतला.
* * *
M.Chopade/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1763706)
Visitor Counter : 162