गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 28 व्या स्थापना दिन कार्यक्रमाला दुरदृष्य प्रणालीद्वारे केले संबोधित, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित
देशातल्या कोट्यवधी गरिबांनाही समानतेचा अधिकार आहे आणि या वर्गाला मुलभूत सुविधा प्राप्त होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होईल – केंद्रीय मंत्री अमित शहा
28 वर्षांच्या वाटचालीत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने 20 लाखाहून अधिक प्रकरणांचा निपटारा केला आणि पिडीतांना 205 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई दिली
कोठडी मृत्यू असो किंवा स्वच्छता कर्मचारी, आदिवासी, दलित यांचे अधिकार, मानवाधिकार आयोगाने प्रत्येक क्षेत्रात त्यांचा आवाज होण्याचा यशस्वी प्रयत्न केला
Posted On:
12 OCT 2021 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 28 व्या स्थापना दिन कार्यक्रमाला दुरदृष्य प्रणालीद्वारे संबोधित केले. नवी दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय, मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण मिश्रा उपस्थित होते.
2014 मध्ये देशात जेव्हा नवे सरकार सत्तेवर आले, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पूर्ण बहुमत असलेले सरकार आले तेव्हा पंतप्रधानांनी अशा क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले ज्याकडे मानवाधिकाराबाबत बोलणाऱ्यांनी याआधी लक्ष दिले नव्हते, असे अमित शहा यांनी यावेळी सांगितले. देशातल्या कोट्यवधी गरिबांनाही समानतेचा अधिकार आहे आणि या वर्गाला मुलभूत सुविधा प्राप्त होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होईल. देशाचे संविधान या कोट्यवधी गरीबांनाही मुलभूत सुविधा प्राप्त करण्याचा अधिकार देते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी याची दखल कोणी घेतली नव्हती असे शहा म्हणाले.
देशात गेल्या सात वर्षाच्या अल्पावधीत जे विकास कार्य झाले ते गेल्या 60 वर्षात झाले नव्हते. सात वर्षाच्या काळात नरेंद्र मोदी सरकारने 10 कोटी लोकांना स्वच्छता गृहे पुरवली, चार कोटी घरांना वीज आणि 13 कोटी कुटुंबातल्या महिलांना स्वच्छ इंधन म्हणजे गॅस सिलेंडर पुरवले आणि याद्वारे मानवाधिकारांचे रक्षण केल्याचे शहा यांनी सांगितले.
याबरोबरच दिव्यांग हे नाव देऊन संपूर्ण देशात सन्मानाची भावना बिंबवण्याचे कार्य या सरकारने केले. वर्तमान दृष्टीकोना अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी लोकांच्या मानवाधिकारांचे रक्षण करण्याचे कार्य केले असल्याचे ते म्हणाले.
28 वर्षांच्या वाटचालीत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने 20 लाखाहून अधिक प्रकरणांचा निपटारा केला आणि पिडीतांना 205 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई दिली. मानवाधिकाराशी संबंधित सर्व क्षेत्रात नवी जागृती आणि जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्य केले.
कोठडी मृत्यू असो किंवा स्वच्छता कर्मचारी, आदिवासी, दलित यांचे अधिकार, मानवाधिकार आयोगाने प्रत्येक क्षेत्रात त्यांचा आवाज होण्याचा यशस्वी प्रयत्न केला असे गौरवोद्गार त्यांनी काढले. हा प्रवास यापुढेही असाच सुरु राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
S.Tupe/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1763352)
Visitor Counter : 237