श्रम आणि रोजगार मंत्रालय
केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टलवर 3 कोटींहून अधिक असंघटीत कामगारांची नावनोंदणी
Posted On:
08 OCT 2021 8:13PM by PIB Mumbai
देशातील असंघटीत कामगारांची माहिती देणारा सर्वात पहिला राष्ट्रीय माहिती मंच म्हणजे ई-पोर्टलवर देशभरातील 3 कोटींहून अधिक असंघटीत कामगारांनी स्वतःची नावनोंदणी केली आहे अशी माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्वीट संदेशाद्वारे दिली आहे.
आज सकाळी हैदराबाद येथे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था, दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण आणि विकास मंडळाच्या नियामक मंडळाची 177 वी बैठक आणि मंडळाची 78 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.
आणखी एका महत्त्वाच्या घडामोडीअंतर्गत, सुमारे 1019 कंत्राटी कामगारांना फायदेशीर ठरणाऱ्या समझोता करारावर नवी दिल्ली येथे आज सेलेबी कंपनी (डीआयएएल) चे व्यवस्थापन आणि विमानतळ कर्मचारी संघाकडे ज्यांचे प्रतिनिधित्व होते असे कंपनीचे कंत्राटी कामगार यांच्यात स्वाक्षऱ्या झाल्या. या करारान्वये प्रत्येक कामगाराला 58,400 रुपयांची रक्कम मिळणार आहे. सर्व कंत्राटी कामगारांना यावर्षी एकूण 6,08,41,600 रुपये इतकी रक्कम वितरीत केली जाणार आहे (रुपये सहा कोटी, आठ लाख, एक्केचाळीस हजार सहाशे फक्त.)
***
S.Tupe/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1762278)
Visitor Counter : 192