जलशक्ती मंत्रालय

आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 2 ऑक्टोबर 2021 रोजी देशभरात स्वच्छ भारत दिन साजरा करण्यात आला

Posted On: 03 OCT 2021 5:26PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाअंतर्गत  भारत सरकार देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी सामुदायिक एकत्रीकरण उपक्रम आयोजित करत, देशभरात आझादी का अमृत महोत्सव (AKAM) साजरा होत  आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या, पेयजल आणि स्वच्छता विभागाने  (DDWS) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण (SBMG) 2 रा टप्पा- अंतर्गत महत्वाच्या उपक्रम/मोहिमांचे आयोजन केले आहे, जेणेकरून हागणदारीमुक्त  (ODF) प्लस  योजनेची गती वाढेल आणि गावात उघड्यावर शौच करणे बंद (ODF)  करण्यासाठी केलेली कामगिरी टिकेल. दरवर्षीप्रमाणे  पेयजल आणि स्वच्छता विभागाने, 2 ऑक्टोबर 2021 रोजी स्वच्छता प्रेरणा दिन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली.

आझादी का अमृत महोत्सव (AKAM) साजरा करण्याचा भाग म्हणून, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वच्छता रथ काढण्यास आरंभ केला, ज्या रथांनी  राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या राजधानीपर्यंत येत जिल्हा/तालुका आणि ग्राम पंचायतींना भेटी दिल्या.  विविध स्तरांवर निवडून आलेल्या प्रतिनिधी/स्थानिक पातळीवर निवडून आलेल्या नेत्यांनी (मुख्यमंत्री, संसद सदस्य, सरपंच) सुमारे 800 हून अधिक स्वच्छता रथांना हिरवा झेंडा दाखवला.

स्वच्छता हीच सेवा 2021 या पंधरवड्यादरम्यान, सामुदायिकपणे  एकत्र येण्याकरता प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्यात  60 लाख लोकांनी भाग घेतला आणि 1.5 लाखांहून अधिक लोकांनी श्रमदान उपक्रमांमध्ये योगदान दिले.  एकदाच वापरण्यायोग्य प्लास्टिकला(SUP) बंदी करण्याचा ठराव मंजूर करण्यासाठी एकूण 43,000 हून अधिक ग्रामसभा घेण्यात आल्या.

***

S.Thakur/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1760664) Visitor Counter : 309


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil