माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीडी न्यूज काॅन्क्लेव्ह (दूरदर्शन वृत्तवाहीनी विचारमंच)यामधून 'रीईमॅजिनिंग डिझास्टर मॅनेजमेंट(आपत्कालीन व्यवस्थापनाचे भविष्य )' यावरील कार्यक्रम प्रसारित


आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व टप्प्यांत बल आणि कार्यक्षमता यांत वाढ होण्यासाठी तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्याविषयी मंथन

Posted On: 02 OCT 2021 10:30PM by PIB Mumbai

 'आझादी का अमृत महोत्सव' या कार्यक्रमातून भारताच्या गौरवशाली स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी केली जात  असून ,यानिमित्ताने दूरदर्शन वृत्तवाहीन्यांवरून (डी.डी. न्यूज)सामान्य माणसांचे जीवन सुखकर करण्यासाठी आणि नवीन चैतन्यशील भारत निर्माण करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या धोरणात्मक उपक्रमांना प्रतिबिंबित करणाऱ्या विषयांवरील उपक्रमांची  मालिका आयोजित केली जात आहे.  डीडी न्यूज कॉन्क्लेव्ह हे एक असे व्यासपीठ आहे, जे मान्यवर व्यक्ती, धोरणकर्ते आणि विविध क्षेत्रातील तज्ञांना एकत्र आणते, जेणेकरून अशा धोरणात्मक उपक्रमांच्या अंमलबजावणी आणि परिणामांवर तसेच पुढील मार्गांबद्दल अंतर्दृष्टी आणि त्यांचा दृष्टीकोन यांबाबत विचारांचे  आदान  प्रदान होऊ शकेल. हे व्यासपीठ,  एक प्रमुख विचारांचे  व्यासपीठ म्हणून उदयास येण्याची अपेक्षा आहे, आणि दूरदर्शनवरून संपूर्ण देशभरातील प्रमुख सरकारी उपक्रमांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्य विचारांचा आराखडा यातून सादर केला जाईल. 

 

 या मालिकेतील तिसरा कार्यक्रम हा    'आपत्ती व्यवस्थापनाची पुन्रसंकल्पना  ' या विषयावर आयोजित करण्यात आला होता, ज्याचे संचालन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेतील (एन आयडीएम) ‌ प्राध्यापक संतोष कुमार यांनी केले तसेच, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीएमए) सदस्य श्री कृष्णा एस.वत्स, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बलाचे (एनडीआरएफ)व्यवस्थापकीय संचालक श्री एस. एन. प्रधान, भारतीय हवामान विभागातील (आयएमडी)वैज्ञानिक  डॉ. आर.  के.जमानी ,ईएसआरआयचे व्यवस्थापकीय संचालक श्री.अगेंद्र कुमार  हया विविध विषयांवरील तज्ञांनी चर्चेत सहभाग  घेतला.या सत्रादरम्यान अनेक शिक्षणतज्ज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि  उत्साही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या स्टुडिओतील प्रेक्षकांनी तज्ञांशी यावेळी संवाद साधला.

 

 यावेळी झालेल्या चर्चेत तज्ञांनी  शमन, प्रतिसाद, पुनर्वसन आणि पुनर्प्राप्ती अशा आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर चर्चा केली.  आपत्ती व्यवस्थापन हे केंद्रसरकार , राज्य सरकार , स्थानिक संस्था, स्वयंसेवी संस्था, नागरीकांतील स्वयंसेवक आणि समुदाय यांच्यामधील एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य असते,असे मंचावरील तज्ञांनी मान्य केले. लवकरात लवकर  संकटाची चेतावणी (चाहूल)देणारी उत्तम प्रणाली विकसित करणे, भौगोलिक नकाशांच्या आधारावर लवचिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, यासारख्या सुविधा निर्माण करणे जेणेकरून समुदायाच्या नेतृत्वाअंतर्गत पुनर्रचना आणि पुनर्वसन  प्रक्रिया पूर्ण करून जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी त्या उपयुक्त ठरतील  यावर  तज्ञांनी भर दिला.

***

MC/Sampada/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1760571) Visitor Counter : 262


Read this release in: English , Urdu , Hindi