जलशक्ती मंत्रालय
चाचा चौधरी यांना नमामि गंगे कार्यक्रमाचे शुभंकर म्हणून घोषित करण्यात आले
गंगा आणि इतर नद्यांप्रती लहान मुलांमध्ये वर्तणूकविषयक बदल घडविण्यासाठी एनएमसीजी ने विनोदी प्रकाशने आणि अॅनिमेटेड व्हिडिओ तयार करून वितरीत करण्यासाठी डायमंड टून्सशी सहकार्य बंध स्थापित केले
राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मोठ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला
Posted On:
01 OCT 2021 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2021
एनएमसीजी अर्थात राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे महासंचालक राजीव रंजन मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अभियानाच्या कार्यकारी समितीच्या 37 व्या बैठकीत चाचा चौधरी यांना ‘नमामि गंगे’ कार्यक्रमाचे शुभंकर म्हणून घोषित करण्यात आले तसेच या बैठकीत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही मुख्य प्रकल्पांबाबत चर्चा होऊन आढावा घेण्यात आला.
युवावर्ग बदलाचा प्रेरक असल्यामुळे अभियानाचा प्रसार आणि सर्वसामान्यांशी संपर्क यासाठी एनएमसीजी युवावर्गावर लक्ष केंद्रित करत आहे. यादृष्टीने पाऊल पुढे टाकत एनएमसीजीने विनोदी प्रकाशने आणि अॅनिमेटेड व्हिडिओ तयार करून वितरीत करण्यासाठी डायमंड टून्सशी सहकार्य बंध स्थापित केले आहेत. गंगा आणि इतर नद्यांप्रती लहान मुलांमध्ये वर्तणूकविषयक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने या साहित्यातील मजकूर संरेखीत केला जाईल. या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 2 कोटी 26 लाख रुपये आहे.
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1760148)
Visitor Counter : 268