संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयएनएचएस अश्विनी, मुंबई येथे 'चेतना': मेंदूचे कार्य प्रभावित करणाऱ्या विकारासाठीच्या उपचार केंद्राचे उद्‌घाटन


'चेतना' नवजात बालके आणि लहान मुलांसाठी विलंबाने विकास होण्याची जोखीम पत्करून सर्व सेवा पुरवते

Posted On: 28 SEP 2021 4:28PM by PIB Mumbai

मुंबई, 28  सप्टेंबर 2021

आयएनएचएस अश्विनी येथील बालरोग विभागात 'चेतना' अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर (ईआयसी) चे उद्‌घाटन 27 सप्टेंबर 2021 रोजी नेव्ही वाइव्हज वेल्फेअर असोसिएशन (पश्चिम विभाग) च्या अध्यक्ष कला हरी कुमार यांनी फ्लॅग ऑफिसर  कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड, व्हाइस एडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत केले. चेतना' नवजात बालके आणि लहान मुलांसाठी विलंबाने विकास होण्याची जोखीम पत्करून एका छताखाली सर्व सेवा प्रदान करेल. या सेवांमध्ये फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच आणि लँग्वेज थेरपी, मानसशास्त्रज्ञांकडून मूल्यांकन आणि समुपदेशन आणि बालरोग तज्ञांकडून वैद्यकीय सल्ला यांचा समावेश आहे.

न्यूरोडेव्हलपमेंटल म्हणजेच मेंदूचे कार्य प्रभावित करणारे विकार ही लहान मुलांच्या आरोग्याची एक सामान्य समस्या असून सुमारे 10% मुलांमध्ये आढळते. नवजात उपचार विभागातून घरी सोडण्यात आलेल्या मुलांमध्ये याचा धोका अधिक असतो. अनेकदा त्यांच्या दैनंदिन हालचाली आणि प्रतिसादातील विलंब किंवा शाळेच्या प्रवेशाच्या वेळी  त्यांच्या विकासातील हे दोष समोर येतात. 'चेतना'चे उद्दिष्ट  (दोन वर्षांच्या वयापूर्वी) विकासात्मक विकार, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, एडीएचडी, लर्निंग डिसेबिलिटी सारखे दोष लवकर शोधणे आणि सहा वर्षांखालील मुलांमध्ये ते पाळणाघरात किंवा शाळेत जाण्यापूर्वी मल्टी मोडॅलिटी उपायांद्वारे त्यांचा प्रभाव कमी करणे हा आहे.

या उपायांचे उद्दिष्ट विकारग्रस्त मुलांना त्यांची जास्तीत जास्त क्षमता मिळवून देणे आणि त्यांना लवकर मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रोत्साहन देणे हे आहे. बालपणात विकसनशील मेंदूची लवचिकता अपेक्षित बदल घडवून आणू शकते. जर लवकर सुधारण्याची संधी मुलांनी गमावली तर नंतरच्या टप्प्यावर शिकताना त्यांचा वेग मंद किंवा अपुरा असू शकतो.

 

 

 S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1758957) Visitor Counter : 179


Read this release in: English