आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
‘राष्ट्रीय पोषण माह’ निमित्त संयुक्त वेबिनारचे आयोजन
चौथ्या राष्ट्रीय पोषण मासनिमित्त आयोजित संयुक्त वेबिनारमध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि महिला व बाल विकास राज्य मंत्री यांचे संबोधन
“देशाच्या आरोग्यासाठी उत्तम पोषण आवश्यक; ते देशाच्या विकासाशी निगडीत आहे”: डॉ भारती प्रवीण पवार
Posted On:
27 SEP 2021 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2021
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार, तसेच केंद्रीय महिला आणि बाल विकास राज्यमंत्री डॉ मुंजपारा महेंद्रभाई यांनी “पहिल्या 100 दिवसांत पोषण आहाराचे महत्व, शैशव जपणूक आणि विकास तसेच कुपोषणाचा प्रतिबंध आणि व्यवस्थापन” या विषयावर चौथ्या राष्ट्रीय पोषण मासानिमित्त आज आयोजित संयुक्त वेबिनारला संबोधित केले.

या वेळी बोलताना डॉ पवार म्हणाल्या, “देशाच्या आरोग्यासाठी जनतेचे उत्तम पोषण गरजेचे आहे. ते देशाच्या विकासाशी निगडीत आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “शिक्षण आणि आरोग्य या सारख्या इतर बाबींवर देखील कुपोषणाचा परिमाण होतो.”

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, केंद्र सरकार नागरिकांच्या सर्वांगीण आरोग्यात सुधारणा करण्यावर भर देत आहे, असे भारती पवार यांनी सांगितले. तर राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन अंतर्गत, निरोगी जीवनचक्र विकसित करण्याच्या दृष्टिकोनानुसार काम करत आहे. यात कुपोषण कमी करण्यासाठी भर दिला जात आहे. याच अनुषंगाने, त्यांनी रक्तक्षय मुक्त भारत आणि जननी सुरक्षा कार्यक्रमांचे उदाहरण दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत, कुपोषणा निर्मूलनाची मोहीम, ‘लोकचळवळ’ म्हणून यशस्वीपणे राबवेल, असा विश्वास डॉ भारती पवार यांनी व्यक्त केला.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1758742)